मोठी बातमी ; महाराष्ट्र राज्यात एकाच वेळी तब्बल ३ लाख रिक्त पदांची भरती केली जाणार. अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये (Government Jobs) अनेक पदे रिक्त असून सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंबंधीची महत्त्वपूर्ण आकडेवारी जाहीर केली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये तब्बल 2 लाख 99 हजार 51 जागा रिक्त आहेत. प्रशासनाचे काम सुरळीत चालावे यासाठी ही पदे टप्प्याटप्प्याने भरली जातील, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. ही सर्व रिक्त पदे लवकरच भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
हिवाळी अधिवेशनादरम्यान विचारण्यात आलेल्या एका तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. राज्याची एकूण मंजूर पदसंख्या 8 लाख 11 हजार 503 असून, त्यापैकी सुमारे 36.54 टक्के जागा सध्या रिक्त असल्याची माहिती त्यांनी दिली. ही सर्व पदे प्रामुख्याने सरळ सेवा भरतीद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार, यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या जात आहेत. त्यामुळे लवकरच विविध शासकीय विभागांच्या भरती प्रक्रियेच्या जाहिराती जाहीर होण्याची शक्यता आहे
“दरम्यान, शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या लाखो तरुणांसाठी ही आनंदाची बातमी असून, प्रशासनालाही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल.”
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati