मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत महिलांची फसवणूक होत आहे. असे भाजप नेते राम कदम यांचे स्पष्ट मत आहे. त्यांच्या मते माझी लाडकी बहीण योजनेत प्रारंभी काही महिलांना दोन महिन्याचा निधी मिळाला, तर काहींना फक्त एका महिन्यांचेच पैसे मिळाले. आता हा निधी थांबलेला आहे , त्यामुळे महिलांमध्ये असंतोष वाढत असल्याचे भाजप नेते राम कदम यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ या योजनेत प्रारंभी काही महिलांना दोन महिन्याचा लाभ मिळाला , काहींना एका महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले. सध्या या योजनेअंतर्गत निधी थांबले असून त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना राम कदम यांनी ही गंभीर बाब सभागृहाच्या लक्षात आणून दिली. त्यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना खूपच परिवर्तनशील असून तिचा लाभ लाखो महिलांना मिळतो आहे. घाटकोपर मतदारसंघात स्थानिक आमदार म्हणून मी स्वतः घरोघरी जाऊन महिलांकडून अर्ज भरून घेतले.
“सुरुवातीला काही महिलांना दोन महिन्यांचा निधी मिळाला, तर काहींना केवळ एका महिन्याचे पैसे मिळाले. त्यानंतर मात्र या योजनेतून पैसे येणं थांबलं आहे. संबंधित महिलांची आधारकार्ड माहिती बँक खात्याशी जोडलेली आहे, तरीही त्यांना निधी का मिळत नाही याची कोणतीच स्पष्ट माहिती मिळत नाही. त्यामुळे राज्यातील सर्व लाभार्थी बहिणींना त्यांच्या खात्यात पैसे का जमा होत नाहीत, हे समजून घेण्याची गरज आहे. यासाठी एक स्वतंत्र पोर्टल असावं, जिथे लाभार्थी आपलं नाव टाकून हे तपासू शकतील की पैसे येणार आहेत की नाही, आणि जर आले नाहीत, तर त्यामागचं कारण काय आहे, हे देखील स्पष्ट व्हावं. अशी मागणी राम कदम यांनी सभागृहात केली.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE