बृहन्मुंबई महानगरपालिकेतील BMC लिपिक भरती प्रक्रियेचे रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आले आहे.
BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक भरती प्रक्रियेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. परीक्षार्थी बीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपले लॉगिन आयडी टाकून उत्तरतालिका तपासू शकतात.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक भरती-२०२४ ऑनलाईन परीक्षेवरील आक्षेपांसाठी सूचना पत्र जारी केले गेले आहे. बृहन्मुंबई महापालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदासाठीची परीक्षा २ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२४ आणि ११ डिसेंबर २०२४ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली.

उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदविण्यासाठी १९ डिसेंबर २०२४ हा अंतिम दिवस आहे. आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया १६ डिसेंबरपासून सुरू झाली असून, अंतिम मुदत गुरुवार, १९ डिसेंबर २०२४ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
उमेदवारांनी बीएमसीच्या https://portal.mcgm.gov.in/For-prospects/Careers-All/Recruitment/Chief-Personnel-Officer या वेबसाईटवर जाऊन विहित शुल्क भरूनच उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदवावा. केवळ या माध्यमातून प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाईल. अन्य कोणत्याही माध्यमातून आलेले आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, तसेच याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही, असे बीएमसीने स्पष्ट केले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati