वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BMC मध्ये नोकरीची संधी ; दरमहा ५० हजार मिळणार पगार ! आजच अर्ज करा

बुहन्मुंबई महानगरपालिकेत BMC  तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदासाठी ऑफलाईन अर्ज १ ऑगस्ट २०२५  पर्यंत करायचा आहे. या भरती विषयक माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. यासाठी लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मग अर्ज करावा. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर  क्लिक करा.

BMC अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाकरिता ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

BMC Bharti 2025

बुहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव येथे ही भरती केली जाणार आहे. याबाबत माहिती https://www.mcgm.gov.in/

prospects/Careers-All या वेबसाइटवर देण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. ही भरती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजीसह स्पीच थेरपिस्ट,स्पीच थेरपीस्ट-सी ऑडिओलॉजिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ई.सी.जी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचसोबत नेत्रतज्ज्ञ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

एकूण १९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट पदासाठी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. ऑडिओलॉजी सह स्पीच थेरपिस्ट पदासाठी ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. ई.सी.जी टेक्निशियन पदासाठी

विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याचसोबत कार्डिओ टेक्नोलॉजीमध्ये बीएस.सी केलेले असावे. न्युरोलॉजी टेक्निशियन पदावासाठी बी.पी.एम,टीअंतर्गत पदवी प्राप्त केलेली असावी.

लॅब टेक्निशियन पदासाठी बी.एससी पॅरामेडिकल टेक्नोलॉजीसह इंटर्नशिप केलेली असावी. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. १ऑगस्ट २०२५ पर्यंत हा अर्ज एल.टी.एमएस. रुग्णालयाचा आवक विभाग येथे पोहचणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २०,००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे.

अधिक माहिती साठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर दिलेली माहिती सविस्तर वाचावी.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

माधवकुटी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा, बुटीबोरी, जि. नागपूर – प्राथमिक शिक्षण सेवक आणि शिपाई पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

Madhavkuti School Recruitment 2026 - Madhavkuti Primary & Secondary Residential School, Nagpur invites Offline applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *