बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मार्फत घेण्यात येणाऱ्या दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या थेट भरतीसंदर्भातील परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही ऑनलाईन परीक्षा आता १३ आणि १४ मे २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
यापूर्वी ही परीक्षा ९ मार्च २०२५ रोजी नियोजित होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र सध्या उपलब्ध असून उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ते डाउनलोड करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्रासाठी उमेदवार https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee या लिंकवर भेट देऊ शकतात.
बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल / M&E) आणि उप अभियंता (सिव्हिल / M&E) या संवर्गातील विविध पदांसाठी देखील ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे. उमेदवारांनी परीक्षेसाठी उपस्थित राहताना प्रवेशपत्रासोबत एक अलीकडचा पासपोर्ट साइज फोटो आणि स्पष्ट फोटो असलेले वैध ओळखपत्र (जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत ठेवणे आवश्यक आहे. अधिकृत प्रवेशपत्र आणि तपशील http://portal.mcgm.gov.in/forprospects/Careers-All/Recruitment/CityEngineer या BMC च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी नव्या तारखांची नोंद घेऊन वेळेत तयारी करणे आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह परीक्षेला उपस्थित राहणे गरजेचे आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE