तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे . ज्यांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे त्याच्यासाठी उत्तम संधी चालून आलेली आहे. बँक ऑफ इंडिया (BOI) येथे अप्रेंटिसशिप पदांची एकूण ४०० रिक्त जागेची भरती सुरु आहे. अशी नवीन जाहिरात प्रकाशित झालेली आहे. पात्र उमेदवार १० जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करू शकतात.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 25 डिसेबरपासून सुरू होणार आहे. ही भरती देशातील विविध राज्यामध्ये होणार असून निवड झालेल्या उमेदवाराना दरमहा निश्चित मासिक वेतन मिळेल. यामध्ये आसाम, बिहार, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, दिल्ली आदी राज्यांचा समावेश आहे. यापैकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि झारखंड या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी असणे आवश्यक आहे. पदवी पूर्ण करण्याचा कालावधी 1 एप्रिल 2021 ते 1 डिसेंबर 2025 दरम्यानचा असावा. अर्ज शुल्क उमेदवाराच्या प्रवर्गानुसार निश्चित करण्यात आले आहे. तर वयमर्यादा 20 ते 28 दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवाराचा जन्म 2 डिसेंबर 1997 पूर्वीचा आणि 1 डिसेंबर 2005 नंतर नसावा.
अप्रेंटिसशिपसाठी निवड प्रक्रिया बँक ऑफ इंडिया आणि NATS च्या नियमांनुसार केली जाईल. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना बँकेच्या विविध शाखांमध्ये प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात येईल.
अर्ज कसा कराल?
सर्वप्रथम www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. नवीन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करा.
Bank of India Apprenticeship 2025 हा पर्याय निवडा. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अर्ज शुल्क भरून फॉर्म अंतिमतः सबमिट करा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati