सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांच्या २ हजार ३३१ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०२६ आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

या भरती मोहिमेअंतर्ग विविध पदांच्या एकूण २ हजार ३३१ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक लिपिक पदांच्या १ हजार ३३२ जागा, शिपाई पदाच्या ८८७ जागा, चालक पदाच्या ३७ जागा लघुलेखक (उच्च श्रेणी) १९ जागा आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) साठी ५६ जागा भरण्यात येणार आहेत. मुंबई उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://bombayhighcourt.nic.in/index.php वर जाऊन अर्ज भरू शकतात.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार असणार आहे. स्टेनोग्राफर लघुलेखक (उच्च श्रेणी) पदासाठी उमेदवारा हा कोणत्याही विद्यापीठातील पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्याकडे शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. कोर्सचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लघुलेखक (निम्न श्रेणी) पदासाठी पदवीधर असावा, आणि त्याच्याकडे शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लिपिक पदासाठी उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे. संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि), MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चालक पदासाठी उमेदवार १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे हलके मोटार वाहन चालक परवाना व 3 वर्षे अनुभव आवश्यक आहे. तर शिपाई पदासाठी किमान ७ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा व परीक्षा शुल्क : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 8 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर भरती नियमानुसार, मागासवर्गीय विद्यार्थांना 5 वर्षे सूट देण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना १ हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आला आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati