JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती; 1लाख पगार , असा करा अर्ज !

मुंबई उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती; 1लाख पगार , असा करा अर्ज !

Bombay High Court Recruitment 2025 : मुंबई उच्च न्यायालयात विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे मुख्य संपादक, संपादक, उपसंपादक, सहायक संपादक अशा एकूण १३ पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावा. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार इत्यादी महत्वाची माहिती जाणून घ्या.

Bombay High Court Recruitment 2025

रिक्त पदांची संख्या:
मुख्य संपादक – १
संपादक – २ (इंग्रजी आणि मराठी भाषेसाठी प्रत्येकी १)
उपसंपादक – ४
सहायक संपादक – ६

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

मुख्य संपादक (Chief Editor)

कायद्याची पदवी (LLB) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge)

संपादक (Editor)

कायद्याची पदवी (LLB) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश, निवृत्त सचिव (विधिमंडळ), निवृत्त प्राचार्य/प्राध्यापक (कायदा महाविद्यालये), निवृत्त अधिकारी (कायदा आयोग)

उपसंपादक (Deputy Editor)

कायद्याची पदवी (LLB) + अनुभव किंवा निवृत्त न्यायिक अधिकारी (Retired Judicial Officer)

सहायक संपादक (Assistant Editor)

कायद्याची पदवी (LLB) किंवा LL.M. अंतिम वर्ष उत्तीर्ण (किमान 55% गुणांसह) + अनुभव किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश (Retired District Judge)

पगार:
मुख्य संपादक: ₹1,50,000 प्रति महिना
संपादक: ₹1,00,000 प्रति महिना
उपसंपादक: ₹80,000 प्रति महिना
सहायक संपादक: ₹60,000 प्रति महिना

वयोमर्यादा:
मुख्य संपादक: ४५ ते ६९ वर्षे
संपादक: ३५ ते ४४ वर्षे
उपसंपादक: ३५ ते ४४ वर्षे
सहायक संपादक: २१ ते ४० वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख:
इच्छुक उमेदवारांनी अर्ज ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावा.

कसा करायचा अर्ज?
मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवार अंतिम तारीख किंवा त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, अर्ज ऑफलाइन पद्धतीनेही सादर केले जाऊ शकतात. ऑफलाइन अर्ज सादर करण्यासाठी खालील पत्त्यावर अर्ज पाठवू शकता:

अर्ज पाठविण्याचा पत्ता:
सेंट्रल प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटरचे कार्यालय,
मुंबई उच्च न्यायालय, सहावा मजला,
जी. टी. बिल्डिंग कम्पाउंड कॉम्प्लेक्स,
मुंबई – ४०० ००१.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *