वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई उच्च न्यायालय २ हजार ३३१ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेत मुदतवाढ !

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज प्रक्रियेत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांनी अजून अर्ज नाही केलेले आहे त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे. या भरती अर्जासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आता १६ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करायचा आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Mumbai High Court Bharti 2026

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (कमी श्रेणी) (Recruitment for the posts of Clerk, Soldier, Driver, Stenographer) पदाच्या २ हजार ३३१ रिक्त जागा (2 thousand 331 vacancies) भरण्यात येणार आहेत.

या भरती मोहिमेअंतर्ग विविध पदांच्या एकूण २ हजार ३३१ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक लिपिक पदांच्या १ हजार ३३२ जागा, शिपाई पदाच्या ८८७ जागा, चालक पदाच्या ३७ जागा लघुलेखक (उच्च श्रेणी) १९ जागा आणि लघुलेखक (निम्न श्रेणी) साठी ५६ जागा भरण्यात येणार आहेत. मुंबई उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकृत संकेतस्थळ https://bombayhighcourt.nic.in/index.php वर जाऊन अर्ज भरू शकतात.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार असणार आहे. स्टेनोग्राफर लघुलेखक (उच्च श्रेणी) पदासाठी उमेदवारा हा कोणत्याही विद्यापीठातील पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्याच्याकडे शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. कोर्सचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लघुलेखक (निम्न श्रेणी) पदासाठी पदवीधर असावा, आणि त्याच्याकडे शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लिपिक पदासाठी उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे. संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि), MS-CIT किंवा समतुल्य कोर्स केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. चालक पदासाठी उमेदवार १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे हलके मोटार वाहन चालक परवाना व 3 वर्षे अनुभव आवश्यक आहे. तर शिपाई पदासाठी किमान ७ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा व परीक्षा शुल्क :अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 8 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. तर भरती नियमानुसार, मागासवर्गीय विद्यार्थांना 5 वर्षे सूट देण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना १ हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आला आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Income Tax Department Mumbai अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Income Tax Department Mumbai Recruitment 2026 Income Tax Department Mumbai Job Recruitment 2026 – Income …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *