JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CBSE 10th Compartment परीक्षेचा निकाल जाहीर !

CBSE 10th Compartment परीक्षेचा निकाल जाहीर !

CBSE 10th Compartment Result 2024 :

सीबीएसईने यावर्षी १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान इयत्ता १० वीची कंपार्टमेंट/पुरवणी परीक्षा घेतली होती. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) इयत्ता 10वीच्या कंपार्टमेंट परीक्षा म्हणजेच पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या पुरवणी परीक्षांना बसलेले विद्यार्थी त्यांचा निकाल पाहू शकतात. परीक्षार्थी त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून cbse.nic.in किंवा cbseresults.nic.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतील.

CBSE ने यावर्षी १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान इयत्ता १० वीची कंपार्टमेंट/पुरवणी परीक्षा घेतली होती. सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत एकाच शिफ्टमध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी सीबीएसईने १३ मे २०२४ रोजी दहावीचा वार्षिक निकाल (CBSE SSC Result 2024) जाहीर केला होता, ज्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी ९३.०६ टक्के होती. सीबीएसईने घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या परीक्षार्थींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ज्यांनी ही पुरवणी परीक्षा दिली आहे ते आता त्यांचा निकाल सीबीएसईच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकतील.

 

निकाल कसा पाहायचा?

पहिल्यांदा CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर जा.

त्यानंतर होमपेजवर ‘2024 Results’ असा बॉक्स दिसेल.

त्या बॉक्समध्ये पहिला ऑप्शन-‘Secondary School Supplementary Examination (Class X) Results 2024- Published on 5th August 2024’ असा दिसेल. त्यावर क्लिक करा.

त्यानंतर एक विंडो उघडेल. तिथे तुम्ही परीक्षा क्रमांक, शाळा क्रमांक आणि जन्म तारीख टाकून सबमीट करा.

त्यानंतर तुमचा निकाल दिसेल.

सीबीएसईने आयोजित केलेल्या १०वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक विषयात किमान 33% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. यावर्षी CBSE इयत्ता 10 ची अंतिम परीक्षा 2024 ची एकूण उत्तीर्ण टक्केवारी ९३.१२ टक्के होती, तर इयत्ता 12 वी साठी ती ८७.९८ टक्के होती.

निकाल या लिंक वर बघता येईल : cbse.nic.inhttps://cbseresults.nic.in/2024/CBSE10th/CBSE10thLogin?ResultType=cbse10Compt

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *