CBSE pattern will be implemented for state Board School : शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून, यावर्षी केवळ इयत्ता पहिलीसाठी हा पॅटर्न लागू होणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ पहिल्या वर्गासाठी सीबीएससी पॅटर्न लागू होईल, तर पुढील वर्षी दोन टप्प्यांमध्ये दुसरी, तिसरी आणि चौथ्या इयत्तांसाठी हा पॅटर्न लागू करण्यात येईल.
राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत सध्या काही संभ्रम आहे. दरम्यान, राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच राज्य बोर्ड शाळांतील विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्न लागू केला जाणार आहे, आणि पहिल्या टप्प्यात फक्त पहिल्या वर्गासाठी हा पॅटर्न लागू केला जाईल.
प्रसार माध्यमांशी बोलताना भुसे म्हणाले, “राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून हा पॅटर्न पूर्णपणे लागू होईल. पहिल्या फेजमध्ये केवळ पहिल्या वर्गासाठी सीबीएससी पॅटर्न लागू केला जाईल, आणि पुढच्या वर्षी दोन टप्प्यांत दुसरी, तिसरी आणि चौथी इयत्तांसाठी तो लागू केला जाईल. सरकारने हा निर्णय राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी घेतला आहे.”
मंत्री भुसे यांनी यावेळी हे देखील स्पष्ट केले की, सीबीएससी पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE