महाराष्ट्र सरकारच्या “लाडकी बहीण” योजनेत मोठा बदल झालेला आहे. काही महिलांना आता हप्ता मिळणार नाही कारण सरकारने तपासणी करून त्यांना अपात्र ठरवले आहे. अजूनही काहींची तपासणी सुरू आहे, त्यामुळे तुम्ही पात्र आहात का हे तपासणे महत्त्वाचे आहे. अधिक माहिती जाणून घ्या , या बद्दल ची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
या योजनेसाठी काही अटी आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवे. जर उत्पन्न जास्त असेल, तर हप्ता मिळणार नाही. घरातील कोणी आयकर भरत असेल किंवा सरकारी नोकरी करत असेल (राज्य सरकार, केंद्र सरकार, नगरपालिका, महामंडळ किंवा इतर सरकारी विभागात), तर त्या घरातील महिलेला ही योजना मिळणार नाही.

निवृत्त आणि पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या घरातल्या महिलांनाही हप्ता मिळणार नाही. मात्र, जर घरात खासगी नोकरी करणारा किंवा कंत्राटी कामगार असेल आणि त्याचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तर त्या घरातील महिलेला हप्ता मिळू शकतो.
आणखी एक नियम असा आहे की इतर सरकारी योजनेतून दरमहा 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल, तर “लाडकी बहीण” योजनेचा लाभ मिळणार नाही. उदाहरणार्थ, संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत असतील तर हप्ता बंद होईल.
पण PM किसान योजनेतून फक्त 500 रुपये मिळत असल्यास ती पात्र राहील. राजकीय पदावर असणाऱ्यांच्या घरातील महिलांनाही हा लाभ मिळणार नाही. तसेच ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी गाडी आहे, त्यांनाही हप्ता मिळणार नाही, पण ट्रॅक्टर चालेल.
सरकार आता अपात्र महिलांचा हप्ता थांबवत आहे. नियम मोडून हप्ता घेत असाल तर तो कधीही बंद होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या अटींमध्ये बसता का ते नीट तपासा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati