आता NEET PG ची परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ ला होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे ही परीक्षा पारदर्शीपणे होईल, अशी भावना या विद्यार्थ्यांची आहे.
राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनईबी) ही परीक्षा दोन टप्प्यात १५ जून रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचे आदेश एनईबीला दिले. त्यावर एकाच टप्प्यात परीक्षा होणे अधिक नि:पक्ष असल्याची प्रतिक्रिया निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने दिली आहे.

नागपुरात या अभ्यासक्रमाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) २७६, तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) १४७ अशा जागा आहेत. एकाच टप्प्यात ही परीक्षा घ्यायची असल्याने केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. त्याच्या तयारीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता एनईबीने आता १५ जून ही तारीख रद्द केली असून, लवकरच या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे. आता ही परीक्षा ३ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. कारण जवळची तारीख तीच आहे. पण अजून अधिकृतपणे राष्ट्रीय परीक्षा मंडळाने तारीख जाहीर केली नाही. ही नवी तारीख अधिकृतरित्या लवकरच जाहीर होणार आहे.
एमबीबीएस वैद्यकीय पदवीधारकांना एमडी, एमएस आणि पीजी डिप्लोमासारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. देशभरात या परीक्षेसाठी अडीच लाखांहून अधिक पदवीधारकांनी अर्ज केले आहेत.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची ‘नीट-पीजी’ परीक्षा एकाच टप्प्यात घ्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला (एनबीई) दिले. दोन टप्प्यांत परीक्षा घेतल्यास मनमानीला वाव मिळतो, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने येत्या १५ जून रोजी होणारी ‘नीट-पीजी’ एकाच टप्प्यात घेण्यासाठी व्यवस्था करावी, अशी सूचना ‘एनबीई’ला केली होती.
‘एमबीबीएस’ वैद्यकीय पदवीधारकांना एमडी, एमएस आणि पीजी डिप्लोमासारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. ‘नीट-पीजी २०२५’ परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ‘युनायटेड डॉक्टर्स फ्रंट’च्या याचिकांवर शुक्रवारी न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्या. संजय कुमार आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. यंदा ‘नीट-पीजी’साठी अडीच लाखांहून अधिक वैद्यकीय पदवीधारकांनी अर्ज केल्याचे ‘एनबीई’ने न्यायालयात सांगितले.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati