निवडणुकामुळे सर्व विद्यापीठांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; उच्च शिक्षण संचालकांच्या सूचना मतदानाच्या आधी एक दिवस व मतदानानंतर एक दिवस निवडणुकीच्या कामामध्ये कर्मचारी व महाविद्यालये यांना इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक ते तीन डिसेंबर हा कालावधी वगळून परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना राज्याचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व अकृषी विद्यापीठांना दिल्या आहेत. अधिक सविस्तर माहिती वाचा.

निवडणुकामुळे सर्व विद्यापीठांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; उच्च शिक्षण संचालकांच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Local government elections)पार्श्वभूमीवर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने सर्व आकृषी विद्यापीठांना परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल (Changes in university exam schedules)करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)1 ते 3 डिसेंबर या कालावधीतील परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच बदललेल्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे,
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.प्रभाकर देसाई (Director-in-charge of Examination and Evaluation Board Dr. Prabhakar Desai)यांनी याबाबतचे माहिती पत्रकाद्वारे दिली आहे. राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या दोन डिसेंबर रोजी या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मतदानाच्या आधी एक दिवस व मतदानानंतर एक दिवस निवडणुकीच्या कामामध्ये कर्मचारी व महाविद्यालये यांना इतर कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक ते तीन डिसेंबर हा कालावधी वगळून परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना राज्याचे शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सर्व अकृषी विद्यापीठांना दिल्या आहेत
त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीतील परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बदललेल्या वेळापत्रकानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा प्रथम वर्ष एलएलएम अभ्यासक्रमाचा 3 डिसेंबर रोजीचा पेपर 12 डिसेंबर रोजी घेतला जाणार आहे. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर अभ्यासक्रमाचा 1 डिसेंबर रोजीचा पेपर 4 डिसेंबर रोजी व 2 डिसेंबर रोजीचा पेपर 5 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. प्रथम वर्ष इंजीनियरिंग 2019 पॅटर्नचा 3 डिसेंबर रोजीचा पेपर 13 डिसेंबर रोजी घेतला जाणार आहे.त्याचप्रमाणे कला शाखेचे मराठी, फ्रेंच, जर्मनी व उर्दू या भाषेचे तीन डिसेंबर रोजी होणारे पेपर आता 7 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहेत
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati