बांधकाम मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्य सरकारने बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. ही योजना म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २०२५. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरजू बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहाय्य पुरवते आणि त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करते.
बांधकाम कामगारांच्या कुटुंबावरील शैक्षणिक खर्चाचा ताण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अनेकदा आर्थिक अडचणीमुळे या कुटुंबातील मुलांना शिक्षण सोडावे लागते किंवा त्याच्या शिक्षणात व्यत्यय येतो. या योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षणापासून ते वैद्यकीय आणि सर्व स्तरावर आर्थिक साहाय्य उपलब्ध करण्यात येते.

या योजनेमुळे बांधकाम कामगार कुटुंबामध्ये शिक्षणाची जागरूकता वाढते आणि मुलांना चांगले भविष्य मिळते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थी आवडीच्या विषयात अभ्यास करू शकतात आणि यामुळे त्यांचा विकास होतो.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
या शिष्यवृत्ती योजनेचा फायदा मिळवण्यासाठी काही निश्चित अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, कामगाराची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कायदेशीर नोंदणी असणे गरजेचे आहे. याशिवाय विद्यार्थी आणि त्याचे/तिचे पालक हे दोन्ही महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असले पाहिजेत.
शैक्षणिक कामगिरीच्या दृष्टीने, विद्यार्थ्याने मागील शैक्षणिक वर्षात किमान पन्नास टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. या योजनेची एक खासियत म्हणजे नोंदणीकृत कामगाराची पत्नी जर शिक्षण घेत असेल तर तिलाही या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो. ही सोय कुटुंबातील महिलांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी केलेली आहे.
शैक्षणिक स्तरानुसार आर्थिक सहाय्य
या योजनेअंतर्गत शैक्षणिक स्तरानुसार वेगवेगळी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते. प्राथमिक शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत दरवर्षी 2,500 रुपये मिळतात. माध्यमिक शिक्षणासाठी इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत 5,000 रुपये दिले जातात. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी इयत्ता अकरावी-बारावीसाठी 10,000 रुपये शिष्यवृत्ती मिळते. पदवी शिक्षणासाठी 20,000 रुपये, तर पदव्युत्तर शिक्षणासाठी 25,000 रुपये दिले जातात. तांत्रिक शिक्षणासाठी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात 60,000 रुपये, तर वैद्यकीय शिक्षणासाठी सर्वाधिक 1,00,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा मोठा भाग भागवण्यास मदत करते.
अर्ज कसा करायचा ?
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती उपलब्ध आहेत – ऑनलाइन आणि ऑफलाइन. ऑनलाइन अर्जासाठी mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागते. येथे शिष्यवृत्ती योजनेचा विभाग शोधून “Apply Online” या पर्यायावर क्लिक करावा लागतो. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रत काढून ठेवणे महत्त्वाचे आहे.
ऑफलाइन अर्जासाठी जवळच्या बांधकाम कामगार मंडळ कार्यालयात जाऊन फॉर्म मिळवावा लागतो. वैकल्पिकरित्या, संकेतस्थळावरून फॉर्म डाउनलोड करून घेता येतो. फॉर्म योग्यरित्या भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा करावे लागते.
कागदपत्रांची यादी
- कामगार नोंदणी प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र हे सर्वात महत्त्वाचे आहे.
- विद्यार्थ्याचे आणि पालकांचे आधार कार्ड,
- कुटुंबाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड
- आधार कार्डशी जोडलेले बँक पासबुक आवश्यक आहे.
- याशिवाय रहिवासी प्रमाणपत्र, शाळा किंवा महाविद्यालयाचा बोनाफाईड सर्टिफिकेट, मागील परीक्षेची गुणपत्रिका, पासपोर्ट साइज फोटो आणि सक्रिय मोबाइल नंबर आवश्यक आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

