वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर !! CSIR अंतर्गत ज्युनिअर स्टेनोग्राफर आणि इतर 209 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू! त्वरित अर्ज करा

CSIR Recruitment 2025 : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR) अंतर्गत ज्युनिअर स्टेनोग्राफर आणि ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट पदांच्या एकूण 209 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाइट https://crridom.gov.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरतीमधून कनिष्ठ सचिवालय सहायक पदांच्या 177 जागा आणि कनिष्ठ स्टेनोग्राफर पदांच्या 32 जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे असावे. सामान्य, ओबीसी (एनसीएल) आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 500 रुपये परीक्षा शुल्क आहे, तर महिला, अनुसूचित जाती/जमाती, अपंग आणि माजी सैनिक उमेदवारांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात येईल.

CSIR Recruitment 2025

पात्रतेसाठी, ज्युनिअर स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराने बारावी किंवा तत्सम शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि स्टेनोग्राफीमध्ये समतुल्य प्रशिक्षण घेतलेले असावे. ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट पदासाठी उमेदवाराने 10+2 किंवा समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे, तसेच संगणकाचे गती आणि DOPT ने वेळोवेळी निश्चित केलेल्या नियमांनुसार संगणक प्रशिक्षण घेतलेले असावे. अर्ज प्रक्रिया 21 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहील, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज सादर करावा.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

CSIR-NCL पुणे – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; ३ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

CSIR-NCL Pune PA-I/PA-II Recruitment 2025 - CSIR - National Chemical Laboratory, Pune invites Online applications....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *