वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

७ जुलै रोजी होणार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा

Central Teacher Eligibility Test (CTET) is conducted by Central Board of Secondary Education (CBSE). This exam is conducted at national level. So the date of this exam has been announced by CBSE. CTET will be conducted on July 7 across the country. The application registration process for this exam has started and April 2nd is the last date to fill the application form.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) घेण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेची तारीख सीबीएसईकडून जाहीर करण्यात आली आहे. देशभरात सीटीईटी ७ जुलैला घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, २ एप्रिल ही अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय स्तरावर सीबीएसईकडून सीटीईटी आयोजित केली जाते. त्यानुसार ७ जुलैला होणारी सीटीईटी ही १९वी परीक्षा असून, देशभरातील १३६ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी २० भाषांचा पर्याय उपलब्ध असणार आहे. पेपर एक सकाळी साडेनऊ ते बारा, तर पेपर २ दुपारी साडेचार या वेळेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

About MahaUpdates

Check Also

UMC उल्हासनगर NUHM/15th FC/HBT/PC अंतर्गत ८२ वैदयकीय पदभरती जाहीर

UMC NUHM/15th FC/HBT/PC Recruitment 2025 - Deputy Commissioner (Medical Health Department), Ulhasnagar Municipal....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *