JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डीडीएसएसवाय (DDSSY) योजना कार्डचे नूतनीकरण करा

 The Department of Health has issued an appeal to renew the DDSSY scheme card for the next year from 1st April 2024 to 31st March 2025.he process of card renewal under the Deendayal Swasthya Seva Yojana implemented by Goa Government’s Department of Health Lokmat News Network has started from Monday, March 4. Online renewal can be done on the website www.goaonline.gov.in. The health department has also mentioned that the renewed card will be mandatory for availing services from affiliated hospitals from April 1, 2024.

गोवा सरकारच्या आरोग्य लोकमत न्यूज नेटवर्क खात्यामार्फत राबविण्यात येणारी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनांतर्गत कार्डच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सोमवार, ४ मार्चपासून सुरू झाली आहे. पुढील १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षासाठी डीडीएसएसवाय योजना कार्ड नूतनीकरण करण्याचे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. ऑनलाईन नूतनीकरण www.goaonline.gov.in या संकेतस्थळावर करता येणार आहे. १ एप्रिल २०२४ पासून नूतनीकरण केलेले कार्ड संलग्न रुग्णालयांमधून सेवा घेण्यासाठी अनिवार्य असणार आहे, असेही आरोग्य खात्याने नमूद केले आहे.

आपली नोंदणी www.goaonline.gov in वर लॉगीन करून डीडीएसएसवाय कार्ड क्रमांक घालावा. नंतर ओटीपी व्हॅलिडेट करावी आणि स्क्रीनवरील तपशीलाची छाननी करून शुल्क प्रक्रिया चालू करावी. शुल्कानंतर पावती जनरेट होईल आणि कार्डचे नूतनीकरण होईल. अन्यथा जवळच्या डीडीएसएसवाय केंद्रावर भेट देऊन डीडीएसएसवाय कार्ड नूतनीकरण करता येणार आहे. वार्षिक नूतनीकरण शुल्क ३ किंवा कमी सदस्यांच्या कुटुंबासाठी २०० रुपये आणि ४ व त्यावरील सदस्याच्या कुटुंबांसाठी ३०० रुपये असल्याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *