Decide Your Next Step After 12th; Take These Courses and Earn an Attractive Salary : १२ वी नंतरचा मार्ग ठरवणं हे तुमच्या आयुष्यभराच्या करिअर आणि भविष्याची दिशा ठरवू शकतं. डिग्री मिळवणं महत्वाचं असलं तरी, आजच्या काळात योग्य कौशल्यं मिळवणं हाच खरा बदल आहे. १२ वीच्या शेवटच्या पेपरनंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एकच प्रश्न असतो – “आता पुढे काय?” काही विद्यार्थी मेडिकल क्षेत्रासाठी NEETची तयारी करतात,
तर काही IIT किंवा NITमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी JEEची तयारी करत असतात. पण हे मार्ग प्रत्येकासाठी सुलभ नसतात. काही विद्यार्थी आर्थिक कारणांमुळे मोठ्या कोर्सेसपासून मागे हटतात आणि मग सुरू होतो सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्सेसचा विचार. पण विचार करा, जर हे कोर्सेस तुमचं करिअर बनवू शकतात, तर तुम्हाला या क्षेत्रांत प्रगती करण्याची संधी मिळवता येईल.
डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात सध्या प्रचंड झपाट्याने वाढ होत आहे. सोशल मीडिया, Instagram, YouTube किंवा Google Ads सारख्या प्लॅटफॉर्मवर ब्रँड प्रमोट करणे शिकून तुम्ही घरबसल्या चांगली कमाई करू शकता. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही नोकरीसाठी तयार असालच, शिवाय फ्रीलान्सिंग सुरू करून स्वतःचा ब्रँड सुद्धा उभारू शकता.
डेटा सायन्स आजच्या डिजिटल युगात अत्यंत मागणी असलेला क्षेत्र आहे. प्रत्येक कंपनी डेटा वापरून निर्णय घेत आहे, त्यामुळे डेटा सायन्सच्या कोर्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. अल्गोरिदम, मशीन लर्निंग आणि Python या टूल्सवर काम करण्याचा अनुभव तुम्हाला या क्षेत्रात एक उत्तम करिअर देऊ शकतो.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे. मशीन लर्निंग, NLP, आणि ऑटोमेशन यांच्या माध्यमातून या क्षेत्रात डिप्लोमा केल्यास तुम्हाला नवनवीन संधी मिळू शकतात. AI क्षेत्रात तज्ञांची सध्या मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे, आणि यावर कोर्सेस विविध ऑनलाईन व ऑफलाइन संस्थांमध्ये उपलब्ध आहेत.
हार्डवेअर आणि नेटवर्किंग च्या क्षेत्रात सुद्धा प्रचंड संधी आहेत. इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करणे शक्य नसेल, तरी हार्डवेअर व नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा करून IT कंपन्यांमध्ये नोकरी मिळवता येऊ शकते. संगणक, नेटवर्क सेटअप आणि रिपेअरिंगसारख्या कौशल्यांच्या मदतीने तुम्ही चांगली कमाई करू शकता.
बिझनेस आणि मॅनेजमेंट या क्षेत्रातील कोर्सेस, जसे की BBA, PGDM, मार्केटिंग आणि फायनान्स यांसारख्या विषयांमध्ये तज्ञ होणे तुम्हाला MNCs मध्ये काम करण्याची संधी देऊ शकते. IIM किंवा इतर प्रसिद्ध संस्थांमध्ये हे कोर्स केल्यास, तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात एक मोठा करिअर गाठू शकता.
यामुळे, १२ वी नंतर वेळ वाया घालवू नका, योग्य कोर्सेस करा आणि आपल्या करिअरचा मार्ग उज्जवल करा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE