वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

लवकरच होणार स्टेनोग्राफर पदांची नवीन भरती! जाणून घ्या सविस्तर

Demand of Stenographer : लवकरच होणार महाराष्ट लोकसेवा आयोगा द्वारे ‘स्टेनोग्राफर’ पदांची नवीन भरती! जाणून घ्या माहिती पुढीलप्रमाणे राज्यातील जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये लघुलेखक संवर्गातील अनेक पदे रिक्त असून, ही पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Demand of Stenographer

खासदार लंके यांनी त्यांच्या निवेदनात स्पष्ट केले की, लघुलेखकांच्या रिक्त जागा भरलेली नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांकडून या कामांचा भार घेतला जात आहे, ज्यामुळे लघुलेखन पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे. लघुलेखन हे एक विशेष कौशल्याधारित पद आहे, आणि इतर कर्मचाऱ्यांना या कार्याचा भार देणे योग्य नाही. राज्यभर अनेक बेरोजगार युवक-युवती लघुलेखन क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तसेच काहीजण पदोन्नतीसाठी प्रतीक्षेत आहेत.

कामकाजातील सुलभता आणि बेरोजगारांना संधी

लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि स्वीय सहाय्यक यांसारखी रिक्त पदे लवकरात लवकर भरली जावीत, अशी मागणी लंके यांनी केली आहे. यामुळे सरकारी कामकाज अधिक कार्यक्षम होईल आणि बेरोजगार युवक-युवतींना सरकारी सेवेत संधी मिळेल.

लोकसेवा आयोगाची भरती प्रक्रिया लवकर राबवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) उच्च व निम्न श्रेणी लघुलेखक पदांसाठी दर तीन वर्षांनी जाहिरात प्रकाशित करत असतो. २०१८ मध्ये झालेल्या भरतीनंतर पुढील भरती २०२१ मध्ये अपेक्षित होती, परंतु कोविड-१९ महामारीमुळे ती २०२२ मध्ये पुढे ढकलली गेली. त्यामुळे लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०२५ मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये निराशेचे वातावरण

गेल्या दोन वर्षांपासून अनेक विद्यार्थी लघुलेखक परीक्षेची तयारी करत आहेत, पण भरती प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे त्यांच्यात निराशा वाढली आहे. बेरोजगारी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वय वाढत चालल्याने विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढला आहे. त्यामुळे, लवकरात लवकर जाहिरात प्रकाशित करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी लंके यांनी केली आहे.

 

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

D. Y. Patil Group अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

D. Y. Patil Group Recruitment 2025 D. Y. Patil Group Job Recruitment 2025 – D. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *