PM कौशल योजना ही एक केंद्र सरकारने केलेली योजना आहे. या योजनेचा भारतातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि स्वयंरोजगाराची संधी देण्याचा उद्देश आहे. ही भारत सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेतून तरुणांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिल जात. तरुणांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना सरकारी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिल जात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. पण आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे – ती म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2025 . या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या .
या योजनेमुळे होणारे फायदे
- निःशुल्क कौशल्य प्रशिक्षण (150 ते 300 तासांचे कोर्स)
- ₹8000 पर्यंत आर्थिक सहाय्य प्रशिक्षण कालावधीत
- प्रमाणित सर्टिफिकेट जे नोकरी किंवा व्यवसायात उपयोगी पडते
- स्वरोजगार किंवा नोकरी मिळवण्याची संधी
- आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता वाढते
योजनेची पात्रता
- उमेदवार भारताचा नागरिक असावा
- वय: 15 ते 45 वर्षांदरम्यान
- शिक्षण: किमान 10वी पास (हिंदी आणि इंग्रजी भाषेचं मूलभूत ज्ञान)
- बेरोजगार किंवा शिक्षण अर्धवट सोडलेलं असावं
- पूर्वीचं कौशल्य असेल, तरी नोंदणी करता येते
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा
- बँक खात्याचे तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
- वैध मोबाईल नंबर
अर्ज कसा करावा?
- ऑफिशियल वेबसाइट: https://www.pmkvyofficial.org वर जा.
- “Register as Candidate” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचं नाव, पत्ता, DOB, शिक्षणाची माहिती भरा.
- तुमच्या आवडीच्या कोर्सचं निवड करा.
- आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
- फॉर्म एकदा तपासून Submit करा.
- यशस्वी नोंदणी झाल्यावर तुमचं ID प्रिंट करून ठेवा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE