Education Budget 2024 शैक्षणिक बजेटमध्ये तरुणांसाठी ७ मोठ्या घोषणा!
Education Budget 2024 :
शैक्षणिक बजेटमध्ये तरुणांसाठी ७ मोठ्या घोषणानिर्मला सीतारामन यांनी शैक्षणिक बजेटमध्ये १००० रोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची घोषणा केली. या केंद्रांमध्ये युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार. याद्वारे त्यांना नोकरी/रोजगार मिळण्यास सक्षम केले जाणार आहे. सरकारने २५ हजार तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प (union budget 2024) मांडला. यात विविध क्षेत्रासांठी घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पात ९ क्षेत्रांचा विकास करण्यासाठी त्यांना अग्रस्थानी ठेवण्यात आले. यामध्ये कृषी, रोजगार, सामाजिक न्याय, उत्पादन, शहरांचा विकास, उर्जा, पायाभूत सुविधा, संशोधन आणि विकास आणि पुढील पिढीसाठी सुधारणा कार्यक्रमचा समावेश आहे. जर शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर या नऊ अग्रक्रमी क्षेत्रात रोजगार, संशोधन व विकासकडे पाहता येईल.
राष्ट्रीय संशोधन निधी स्थापन केला जाणार-
देशात नवोपक्रम, संशोधन आणि विकासाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच मूलभूत संशोधन आणि प्रोटोटाइप विकासासाठीचे संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय संशोधन निधी स्थापन केला जाणार आहे. व्यावसायिक स्तरावर खाजगी क्षेत्राद्वारे आयोजित संशोधन आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांचा वित्त पूल देखील तयार केला जाणार आहे, अशी माहिती शैक्षणिक अर्थसंकल्प २०२४ सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
शिक्षण आणि रोजगारासाठी 7 मोठ्या घोषणा-
शैक्षणिक अर्थसंकल्प २०२४ मध्ये शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील ७ मोठ्या योजनांचा उल्लेख आहे.
एक हजार रोजगार प्रशिक्षण केंद्रे, २५००० तरुणांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार.
- १००० ITI अपग्रेड केले जातील.
- प्रथमच नोकरी शोधणाऱ्यांसाठी EPFO अंतर्गत ३ महिन्यांचा पगार मिळणार.
- नोकरी देणाऱ्यांना आणि प्राप्तकर्त्यांना इन्सेंटिव्ह
- पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज
- पंतप्रधान इंटर्नशिप योजनेंतर्गत ५ हजार रुपये
- बिहारमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये
शैक्षणिक अर्थसंकल्प 2024 मध्ये किती तरुणांना रोजगार मिळेल?
निर्मला सीतारामन यांनी शैक्षणिक बजेटमध्ये १००० रोजगार प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची घोषणा केली. या केंद्रांमध्ये युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार. याद्वारे त्यांना नोकरी/रोजगार मिळण्यास सक्षम केले जाणार आहे. सरकारने २५ हजार तरुणांना नोकरीचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.