JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

देशातील ३० लाख बेरोजगारांना नोकरी देणार !!!

A young hamal (porter) met me at the Delhi railway station. He told me that I am a civil engineer and doing the work of Hamal. If the Congress government comes to the center, it will first give priority to giving jobs to 30 lakh unemployed people. Congress leader Rahul Gandhi promised to train every engineering graduate youth and give 1 lakh every year. Congress’s Bharat Jodo Nyaya Yatra reached Rajasthan from Madhya Pradesh on Thursday afternoon. The Yatra entered Danpur in Banswar (Rajasthan) from Sailana of Ratlam (Madhya Pradesh).

दिल्ली रेल्वे स्थानकात एक तरुण हमाल (कुली) मला भेटला. त्याने मला सांगितले की, मी सिव्हिल इंजिनीअर आहे आणि हमालाचे काम करत आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास पहिल्यांदा ३० लाख बेरोजगारांना नोकरी देण्यास प्राधान्य देणार आहे. प्रत्येक इंजिनीअर पदवीधर तरुणाला प्रशिक्षण आणि प्रत्येकाला दरवर्षी १ लाख देऊ, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा गुरुवारी दुपारी मध्य प्रदेशातून राजस्थानमध्ये पोहोचली. यात्रा रतलामच्या सैलानातून (मध्य प्रदेश) बांसवाडातील दानपूरमध्ये (राजस्थान) प्रवेश केला.

यावेळी राहुल गांधी राजस्थानच्या सीमेपर्यंत खुल्या जीपमधून आले आणि तेथून ते बांसवाडा शहरात पोहोचले. याठिकाणी त्यांनी २० मिनिटे रोड शो केला आणि गोविंद गुरू सरकारी कॉलेजच्या मैदानावरील सभेला संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले की, देशवासीयांच्या खिशातील पैशातून केवळ पाच टक्के लोक देश चालवितात. जातनिहाय जनगणना झाल्यास ९० टक्के लोकांना कळेल की आपली कशी फसवणूक केली जात आहे. काँग्रेसच्या घोषणापत्रात शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे पिकांना हमीभाव मिळाला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *