महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 10 मे होती. अर्जासोबतच ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 14 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.
ही परीक्षा “पवित्र” संगणकीय प्रणाली द्वारे आयोजित केली जात असून, यंदा D.Ed, B.Ed आणि M.Ed अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थीही पात्र मानले जातील. मात्र, 5 मे 2025 पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नवीन सुधारित पात्रता अटींचा लाभ घ्यायचा असल्यास नवीन अर्ज पुन्हा भरावा लागेल. अशा पुनःश्च अर्जालाच अंतिम समजले जाईल आणि आधीचा अर्ज बाद करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
TAIT 2025 परीक्षा कालावधी व सूचना
TAIT 2025 परीक्षा 24 मे ते 5 जून 2025 या कालावधीत ऑनलाइन स्वरूपात घेतली जाणार आहे. B.Ed., M.Ed., MPSC व इतर स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांची वेळ तालमेल साधण्यासाठी, संबंधित विद्यार्थ्यांनी आपली परीक्षा वेळांची माहिती 14 मे 2025 पर्यंत विहित नमुन्यात या लिंकवर सादर करावी.
ही माहिती न दिल्यास आणि परीक्षेपासून उमेदवार वंचित राहिल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराचीच असेल, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE