शेतकऱ्यांना आता परदेशांत जाऊन शेती करण्याची नवीन संधी सरकारने उपलब्ध करूंन दिली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून १ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक त्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26’ ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेता येणार आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.
या योजनेंतर्गत युरोप-नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्त्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स, चीन, दक्षिण कोरिया या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 31 जुलै पर्यंत असणार आहे.
युरोपातील नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स या देशांत फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन, इस्राईलमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण,जपानची सेंद्रिय शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, ही तेथील शेतीची वैशिष्ट्ये आहेत
मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या देशांत फळे व भाजीपाला पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान, चीनमध्ये विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो, दक्षिण कोरिया देशात आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान पाहायला मिळाणार आहे
शेतकरी अभ्यास दौऱ्याकरिता निवडीचे निकष म्हणजे, लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8-अ उतारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र, शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.
शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकांतील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये एक लाख प्रती लाभार्थ्यांना कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE