वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

बार्टी (पुणे ) मार्फत तरुण वर्गाला निःशुल्क उद्योजकता प्रशिक्षण !

पुण्यातील बार्टी या संस्थेकडून युवक व युवतीला निःशुल्क उद्योजकता प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण १ महिना कालावधीचे आहे. १८ नोव्हेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५  खाली दिलेली सविस्तर माहिती जाणून घ्या.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Free entrepreneurship training for youth through Barti (Pune)!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेमार्फत अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक व युवती आणि महिलांसाठी पुण्यातील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांचेकडून एक महिना कालावधीचे नि:शुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी दि. १८ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२५ आहे.

अनिवासी स्वरुपाच्या या प्रशिक्षणात उद्योगाची निवड, उद्योग उभारणी व व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, विविध कर्ज योजना-अनुदान आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, उद्योजकांचे अनुभव, उद्योगांना भेटी तसेच उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापन इत्यादी विषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी किमान इयत्ता आठवी पास असणे गरजेचे आहे.तसेच वयोमर्यादा १८ ते ४५ आहे. पासपोर्ट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आदी कागदपत्रांसह ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. उद्योजकता परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे येथे हजर राहावे, असे आवाहन विभागीय अधिकारी डॉ. अभिराम डबीर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IAIR टेक्नॉलॉजीज प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर – लेखापाल पदासाठी मुलाखतीची सूचना

IAIR Technologies Job 2025 - IAIR Technologies Private Limited, Chhatrapati Sambhajinagar invites Online applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *