केंद्र व राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी एक योजना केली आहे. ती योजना म्हणजे फ्री आटा चक्की योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना मोफत आटा चक्की दिली जाते. त्यामुळे त्या स्वतः चा रोजगार सुरु करू शकतील आणि घरातच पीठ तयार करू शकतील.
या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील महिलांना घराजवळ पीठ दळण्याची सोय करून देणे तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे. या योजनेमुळे महिलांना केवळ वेळेची आणि पैशाची बचत होते , तर त्यांचा आत्मविश्वास आणि आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होते.
या योजनेचे मिळणारे लाभ
- महिलांना १००% अनुदानावर आटा चक्की दिली जाते.
- चक्कीचा वापर घरासाठी किंवा व्यवसायासाठी करता येतो.
- यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.
- गावातील इतर महिलांसाठी सेवा देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते.
- चक्की घराजवळ असल्याने वेळ, श्रम आणि
- प्रवासाचा खर्च वाचतो. महिलांना सामाजिक मान मिळतो आणि त्यांचा आत्मसन्मान वाढतो.
योजनेसाठी पात्रता
- बँक खाते आधार व मोबाईल क्रमांकासह लिंक असणे गरजेचे आहे.अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी.
- ती ग्रामीण भागातील रहिवासी असावी.
- किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- घरगुती मासिक उत्पन्न ₹12,000 किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदार महिला BPL, SC/ST किंवा OBC श्रेणीत येत असल्यास प्राधान्य.
योजनेचे उद्दिष्ट
- ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
- गावातच रोजगाराची संधी निर्माण करणे.
- घरगुती कामात मदत व वेळेची बचत करणे.
- गावात सामूहिक सुविधा तयार करणे.
- गरीब व वंचित महिलांना आर्थिक समावेशात सामील करणे.
- फ्री आटा चक्की योजनेसाठी अर्ज कसा करावा?
योजनेचा अर्ज कसा करायचा ?
- आपल्या राज्याच्या खाद्य व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जा. योजना निवडा आणि फॉर्म डाउनलोड करा.
- वैयक्तिक माहिती, बँक तपशील, आधार क्रमांक, पत्ता, उत्पन्न इत्यादी भरा.
- आवश्यक कागदपत्रांसह (आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, फोटो) फॉर्म जमा करा.
- जवळच्या खाद्य विभाग कार्यालयात अर्ज सादर करा.
- तपासणी व मंजुरीनंतर चक्की तुमच्या पत्त्यावर पोहचवली जाते.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE