राज्यसरकारने २०२५ मध्ये बांधकाम मजुरांसाठी व महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्या योजनेअंतर्गत त्यांना मोफत किचन किट वितरित केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे. या योजनेचे मुख्य ध्येय बांधकाम मजुरांच्या जीवनात व्यावहारिक सुधारणा घडवून आणणे आहे . राज्य सरकारने ओळखले आहे की कामगारांना केवळ रोजगाराच्या संधीपुरते मर्यादित न राहता , त्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
या योजनेतून एकूण अकरा उपयुक्त वस्तू दिल्या जाणार
- धातूची पेटी
- प्लास्टिकच्या चटईचा तुकडा
- पंचवीस किलो धान्य साठवण्याची कंटेनर
- एक किलो क्षमतेचा साखर डबा
- पाचशे ग्राम चहापत्तीचा डबा
- अठरा लिटर क्षमतेचा पाणी शुद्धीकरण यंत्र
- सर्व वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी विशेष पेटी

पात्रता
- या योजनेसाठी काही अटी पूर्ण करायच्या आहे.
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी असणे आवश्यक
- कामगाराची स्थिती सक्रिय असावी
- महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे गरजेचे
- वैध स्मार्ट कार्ड धारक असावे
आवश्यक कागदपत्र
- कामगार नोंदणी स्मार्ट कार्ड
- आधार कार्डची प्रत
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
अर्ज कसा करायचा ?
अर्जाचा योग्य नमुना भरून जिल्हा स्तरावरील कामगार सुविधा केंद्र किंवा तालुका कामगार कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
योजनेचे व्यापक फायदे
आर्थिक बचत: या योजनेमुळे कामगारांच्या मासिक खर्चात लक्षणीय बचत होईल. घरगुती वस्तूंचा खर्च वाचल्याने कुटुंबाच्या अन्य गरजांकडे लक्ष देता येईल.
जीवनमान सुधारणा: केवळ कामाच्या ठिकाणी नाही तर घरातील दैनंदिन आवश्यकतांमध्येही सरकारी मदत मिळत आहे. यामुळे कामगारांच्या जीवनमानात व्यापक सुधारणा होईल.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

