Gold Silver Rate Today: गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली असून तोळ्याने 90 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता सोनं 1 लाख रुपयांच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज पुन्हा सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, आणि विक्रमी टप्पा गाठला आहे.
नाशिक सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे आता सोने आणि चांदी खरेदी सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. 24 कॅरेट सोन्यासाठी आज 10 ग्रॅमला 160 रुपयांची वाढ झाली असून, त्यामुळे सोन्याचा दर 91 हजार रुपयांवर गेला आहे.
चांदीच्या दरातही आज तेजी आहे. नाशिक सराफा बाजारात एक किलो चांदीसाठी 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे, आणि त्यामुळे एक किलो चांदीचा दर 1 लाख 5 हजार रुपयांवर पोहोचला आहे.
मार्च महिना सुरू झाल्यापासून सोनं आपला रंग दाखवत आहे. मागील दोन महिन्यांतील दरवाढीला अनुसरून, या महिन्यातही सोनं महाग झाले आहे. गेल्या 18 दिवसांत सोने दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 7150 रुपयांची वाढ झालेली आहे.
मध्यपूर्वेतील तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याची ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणून प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे. यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे.
पुन्हा तेजी! 2 दिवसांत 1100 रुपयांची वाढ, आज 24 कॅरेट सोन्याचा दर काय?
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE