Golden Job Opportunity at EXIM Bank : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहत असाल, तर EXIM बँक तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे. EXIM बँक (Export-Import Bank of India) ने मॅनेजमेंट ट्रेनी, डिप्टी मॅनेजर, आणि चीफ मॅनेजर या पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे.
त्यामुळे अर्ज करण्यास उशीर न करता आजच अर्ज करा. EXIM बँक ही भारत सरकारच्या मालकीची प्रतिष्ठित वित्तीय संस्था आहे, जी 1982 मध्ये स्थापन झाली होती. तिचं मुख्यालय मुंबईत असून, देशभर आणि परदेशातही तिची कार्यालयं आहेत. EXIM बँक भारताच्या निर्यात व आयात व्यवहारांना चालना देण्यास मदत करते आणि भारतीय कंपन्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आर्थिक मदत पुरवते.
या भरती मोहिमेत एकूण 28 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत, ज्यात मॅनेजमेंट ट्रेनी साठी 22 पदं, डिप्टी मॅनेजर साठी 5 पदं आणि चीफ मॅनेजर साठी 1 पद आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 22 मार्च 2025 पासून सुरू झाली असून, 15 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज करणाऱ्यांना EXIM बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अर्ज करताना संबंधित कागदपत्रं अपलोड करा आणि अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा. अर्ज शुल्क सामान्य व ओबीसी उमेदवारांसाठी ₹600 असून, SC, ST, PwBD, EWS आणि महिला उमेदवारांसाठी ₹100 आहे.
EXIM बँकेने मे 2025 मध्ये लेखी परीक्षा घेण्याची शक्यता व्यक्त केली आहे, त्यामुळे अर्ज लवकर पूर्ण करून तयारीला सुरूवात करा. EXIM बँकेत नोकरी मिळवण्यामुळे तुम्हाला सरकारी क्षेत्रातील प्रतिष्ठित कामकाजाचा अनुभव मिळेल, तसेच आकर्षक वेतन व फायदे, करिअरची स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. ही एक महत्त्वाची संधी आहे, त्यामुळे वेळ न दवडता अर्ज करा आणि EXIM बँक मध्ये तुमचं करिअर सुरू करा!
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE