वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी!! लाडक्या बहिणींना व्यवसायाची संधी ; मिळणार ३० ते ४० हजार रुपये कर्ज !

आता लाडक्या बहिणींना, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत व्यवसाय व उद्योग करण्यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत स्वरूपात कर्ज देण्यात येणार आहे. ते कर्ज ३० हजार अथवा 40 हजार रुपये इतके असणार आहे. त्यांच्या व्यवसायानुसार कर्ज देण्यात येणार आहे.  हे कर्ज बिनव्याजी  देण्यात येणार आहे. लाड्क्याबहिणींना काहीच व्याजदर नाही भरायचा आहे. बँकांना व्याजदर सरकारकडून देण्यात येईल. कर्ज मिळण्यासाठी काय पात्रता पाहिजे , अर्ज कसा करायचा आहे. याबद्दल सविस्तर जाणून घ्या. सगळी माहिती खाली दिलेली आहे.

लाडक्या बहिणींना या कर्जासाठी बरेच प्रश्न पडलेले आहेत. त्या विविध प्रश्न विचारत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने या योजनेबद्दल महिलांना माहिती देण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Karj Yojna 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाते. आता पर्यंत या योजनेअंतर्गत महिलांना ११  हफ्ते न चुकता त्यांच्या खात्यात १५०० देण्यात आलेले आहेत. तसेच आता जून महिन्याचा हफ्ता देखील लवकरच वाटप होईल.

आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होत की आम्ही लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी छोटा मोठा उद्योग सुरु करता यावा म्हणून त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक रकमी त्यांच्या व्यवसायानुसार ३० ते ४० हजार रुपये खात्यात कर्जाच्यास्वरूपात जमा केले जाईल. आणि जसे जसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या संबंधित महिलेचे पैसे जमा होणार आहेत तसेच ही कर्जाची रक्कम त्या ठिकाणी संबंधित बँक कट करून घेणार आहे आणि या स्वरूपाने ही योजना चालणार आहे

कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा ?

आपल्या लाडक्या बहिणींचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे कर्ज घ्यायचे असल्यास म्हणजेच की ज्या बहिणींना अथवा महिलांना काही व्यवसाय करायचा आहे आणि त्यांना या योजनेअंतर्गत कर्ज हवे असल्यास त्यांनी अर्ज कुठे करायचा तर यासाठी सरकार लवकरच एक शासन निर्णय प्रकाशित करणार आहे आणि त्यानुसार मग कोणत्या बँकेमधून हे कर्ज मिळणार आहे किंवा कोण कोणत्या बँक ही प्रकरण करायला तयार असणार आहे याबाबतची आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे. येत्या काही दिवसातच या योजनेची देखील अंमलबजावणी सरकार द्वारे केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे

कर्ज घेतल्यास व्याजदर किती लागणार ?

जर महिलांनी त्यांच्या व्यवसायासाठी लाडकीबहीण योजनेअंतर्गत कर्ज घेतले तर त्याला व्याजदर किती लागणार हा प्रश्न पडलेला आहे. तर ही रक्कम बिनव्याजी देण्याचे सरकारचे धोरण असणार आहे. याचा अर्थ यासाठी जे काही व्याजदर असणार आहे ते बँकेला सरकारद्वारे दिले जाईल.  आणि लाडक्या बहिणीनं कडून कोणत्याही प्रकारचे व्याजदर  घेतले जाणार नसल्याचे बोलले जात आहे परंतु हे ज्यावेळी अधिसूचना अथवा शासन निर्णय प्रकाशित करण्यात येणार आहेत त्याचवेळी आपल्याला याची खात्री देता येणार आहे कारण जोवर अंमलबजावणी प्रक्रिया होत नाहीत तोपर्यंत या संदर्भात कुठलीही खात्रीशीर माहिती देत आहेत नसते.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

BVP COFA पुणे – १६ शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BVP COFA Recruitment 2026 - Bharati Vidyapeeth, Pune invites Online & Offline applications in prescribed format.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *