वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Android 16 pixel वापरकर्त्यांसाठी गुगलने आणले नवीन अपडेट ! काय आहे ते जाणून घ्या

नवीन अपडेट Android 16 pixel वापरणाऱ्यांसाठी गूगल ने आणलेला आहे. आता तुमच्या डिव्हाईसमध्ये काय नवीन बदल आले आहे , कोणत्या नवीन फीचर्स आल्या , कोणते डिव्हाईस या अपडेट साठी पात्र आहेत. आणि तुम्हाला तुमचा फोन कसा अपडेट करता येईल . याबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे. 

Android 16 pixel मध्ये काय नवीन आहे ?

Android 16 pixel मध्ये काही निवडक अँपसाठी रियल-टाईम अपडेट ची सुविधा मिळणार आहे. यामुळे यूजर्सना अ‍ॅप उघडण्याची गरज कमी भासेल. सुरुवातीला ही सुविधा राईड-हेलिंग व फूड डिलिव्हरी अ‍ॅप्समध्ये लागू होणार आहे. सॅमसंग, ओप्पो, वनप्लस यांसारख्या ब्रँड्ससोबत गुगलने यासाठी सहकार्य केले आहे. याशिवाय, एकाच अ‍ॅपमधील अनेक नोटिफिकेशन्स आता आपोआप एकत्र करून दाखवण्यात येणार आहेत, ज्यामुळे clutter कमी होईल.

Android 16 pixel New update

कानाने ऐकू कमी येणाऱ्या लोकांसाठी सुविधा 

LE Audio श्रवणयंत्रासाठी android 16 मध्ये नविन सुविधा देण्यात आली आहे. कॉलदरम्यान युजर फोनचा मायक्रोफोन वापरू शकतो, ज्यामुळे आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो. याशिवाय, व्हॉल्यूम व इतर सेटिंग्ज आता फोनमधून थेट कंट्रोल करता येणार आहेत.

Protection ची सुविधा 

Android 16 मध्ये Advanced Protection ही गुगलची सर्वोच्च सुरक्षाव्यवस्था आता मोबाईल युजर्ससाठी आली आहे. ही सुरक्षा प्रणाली फिशिंग, मालिशियस अ‍ॅप्स, बनावट कॉल्स व वेबसाइट्सपासून संरक्षण करते. एका टॅपने तुम्ही ही सुविधा अ‍ॅक्टिवेट करू शकता.

टॅबलेट वर अनेक अँप्स उघडता येईल 

टॅबलेट आणि फोल्डेबल डिव्हाईसवर आता अनेक अ‍ॅप्स एकाच स्क्रीनवर वेगवेगळ्या विंडोजमध्ये उघडता येतील. या फीचरमुळे Split-screen आणि Single-app मोडपेक्षा अधिक कार्यक्षमतेने मल्टीटास्किंग करता येईल

मोठ्या स्क्रीनसाठी कीबोर्ड शॉर्टकट व टास्कबार ओव्हरफ्लोसारख्या फीचर्सची भर पडली आहे. याशिवाय, बाह्य स्क्रीन कनेक्टिव्हिटीची चाचणी लवकरच सुरू होणार आहे.

Android 16 तुमच्या फोन वर कसा डाउनलोड करायचा ?

तुम्ही पिक्सेल ६ किंवा त्यानंतरचे डिव्हाईस वापरत असाल तर OTA (Over-the-Air) अपडेटद्वारे Android 16 डाउनलोड करता येईल.

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

TISS SSW – MA (Social Work) ; रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर १ पदासाठी अर्ज करा !

TISS SDCO Job 2025 - School of Social Work, Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *