राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण !
Government ITI trade list in Maharashtra :
विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाभिमुख कौशल्ये विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या राज्यातील १४ सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे म्हणजेच आयटीआयचे नामकरण करण्याची घोषणा कौशल्यविकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सोमवारी केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. याआधी राज्यातील फक्त दोन शासकीय आयटीआय संस्थांना नावे होती. उर्वरित आयटीआय संस्थांचे नामकरण करण्याबाबतच्या नागरिकांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
राज्यातील सरकारी आयटीआय संस्थांपैकी फक्त दोनच संस्थांची ओळख नावांद्वारे होती. उर्वरीत संस्था त्या-त्या शहराच्या किंवा गावाच्या नावाने ओळखल्या जात होत्या. आता या संस्थांना थोर समाजसुधारक किंवा मान्यवर व्यक्तींचे नाव देण्याच्या सूचना आल्या होत्या. त्या सूचनांनुसार राज्यातील ठाणे, मुंबई, जामखेड, बीड, जव्हार, येवला, कोल्हापूर, अमरावती, सांगली, जळगाव, आर्वी, बेलापूर, कुर्ला आणि भूम या १४ ठिकाणच्या आयटीआय संस्थांचे नाव बदलण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने मंजूर केला.
नावात बदल झालेल्या औद्योगिक संस्थांची माहिती खालीलप्रमाणे-
१. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे – धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे
२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई – १ – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई-१
३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि अहमदनगर
४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि बीड – कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि बीड
५. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर – भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि पालघर
६. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि. नाशिक- महात्मा ज्योतिबा फुले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, नाशिक
७. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर – राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर
८. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती – संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती
९. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली
१०. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव – कवयत्री बहिणाबाई चौधरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
११. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी, जि. वर्धा – दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी, जि वर्धा
१२. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई – दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई
१३. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई – महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई
१४. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव – आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि धाराशिव