JOIN Telegram

वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सरकारची शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; पीएम धन धान्य योजना ! आजच लाभ घ्या

भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना तयार केली आहे. ती म्हणजे पीएम धन धान्य योजना ; देशातील शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे शेती करताना त्याला जास्त कष्ट लागू नये यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील राहते. यावर्षीच्या अर्थप्रकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या योजनेचा ऐकूण खर्च २४,००० कोटी रुपये प्रतिवर्ष इतका असून तब्बल १ .७ कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी सांगितलं. या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

पीएम धन धान्य योजनेअंतर्गत शेतीच्या विकासासाठी सध्या चालू असलेल्या विविध ३६ योजनांना एकत्र करून शेतीचा विकास करण्यावर भर दिला जाईल.  यामध्ये देशभरातील १०० जिल्ह्यांचा समावेश असेल. कमी उत्पादकता, पिकांची कमी पेरणी आणि सरासरीपेक्षा कमी कर्ज उपलब्धता असलेल्या जिल्हयांना या योजनेत (PM Dhan Dhanya Yojana) स्थान मिळेल.

PM Dhan Dhanya Yojana 2025

या योजनेअंतर्गत, पीक विविधीकरण, शाश्वत आणि हवामान-लवचिक शेतीवर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय, कापणीनंतरची साठवण क्षमता वाढवण्यावर आणि तंत्रज्ञान सुधारण्यावरही भर दिला जाईल. याशिवाय पंतप्रधान धन-धन कृषी योजनेअंतर्गत (PM Dhan Dhanya Yojana) शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वेगवेगळी अवजारं, बी-बियाणे, खत खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाईल.

तसेच या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात रोजगार कसा वाढेल? यावरही काम केलं जाईल. यासोबतच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी पंप आदी उपकरणं घेण्यासाठीही अर्थसहाय्य केले जाईल. योजनेचा मुख्य उद्देश काय ? या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना मदत करणे शेतीत सुधारणा घडवून आणणे शेतीचे उत्पादन वाढवणे.

शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्यास प्रोत्साहन देणे. ग्रामपंचायत आणि गट स्तरावर धान्य साठवण्याची सोय वाढवणे. सिंचनाच्या सोयी सुधारणे शेतकऱ्यांना कमी आणि दीर्घ मुदतीचे कर्ज सहज उपलब्ध करून देणे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *