JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Govt Medical College Jalgaon येथे विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती सुरू!

Govt Medical College Jalgaon येथे विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती सुरू!

Govt Medical College Jalgaon Recruitment 2024 :

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती सुरू आहे. या भरतीतून एकूण २८ जागा भरल्या जातील. सहाय्यक प्राध्यापक यापदी रुजू झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना १,००,०००/- वेतन दिले जाईल. कोणत्या विषयासाठी किती पदे रिक्त आहेत, त्या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता काय हे जाणून घेऊ.

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरू करण्यात आली आहे. या भरतीतून सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या एकूण २८ जागा भरण्यात येतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार या भरतीमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करून सहभागी होऊ शकतात.

या भरतीत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी त्यांचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करायचा आहे. अर्ज करतेवेळी शैक्षणिक पात्रते संदर्भातील हमी देणारी प्रमाणपत्रे, तसेच कामाच्या अनुभवासंदर्भातील हमी देणारी प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे अर्जासोबत जोडणे महत्त्वाचे आहे. अपूर्ण पद्धतीने भरलेला अर्ज भरती प्रक्रियेत ग्राह्य धरला जाणार नाही.

Name and No. of Posts रिक्त पदे : 

  • ॲनाटोमी २
  • फिजिओलॉजी १
  • बायोकेमिस्ट्री २
  • फार्माकोलॉजी २
  • मायक्रोबायोलॉजी १
  • फॉरेन्सिक मेडिसिन १
  • पॅथॉलॉजी २
  • कम्युनिटी मेडिसिन २
  • जनरल मेडिसिन २
  • जनरल सर्जरी २
  • ऑर्थोपेडिक २
  • ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनॅकॉलॉजी २
  • पीडिएट्रिक्स १
  • डरमॅटोलॉजी १
  • ॲनास्थेशियोलॉजी ३
  • रेडिओलॉजी १
  • ऑपथल्मोलॉजी १

Educational Qualification शैक्षणिक पात्रता
वरती नमूद केलेल्या विषयांसाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू होण्यासाठी उमेदवाराचे त्या त्या विषयातील पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांना वैद्यकीय क्षेत्रातील कामाचा तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास शिकवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. भरती अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

सदर भरतीत ४० वर्षे आणि त्याहून कमी वय असलेले उमेदवारच सहभाग घेऊ शकतात. मागासवर्गीय उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा ४५ वर्षे असेल. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक मनोहर झाल्यानंतर त्या उमेदवाराला दर महिना १,००,०००/- वेतन दिले जाईल.

सहाय्यक प्राध्यापक म्हणून केली जाणारी ही नेमणूक कंत्राटी तत्त्वावर असेल. त्यानुसार उमेदवार एक वर्षासाठी सहाय्यक प्राध्यापक या पदी रुजू होईल. अर्ज सादर केल्यानंतर त्यातून त्या अर्जांची पडताळणी करून पात्र उमेदवारांची मुलाखत फेरीसाठी निवड करण्यात येईल. मुलाखत फेरी कधी होईल यासंदर्भातील पत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. जळगाव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी तसेच तेथील भरती संदर्भातील अधिक माहिती https://gmcjalgaon.org/ या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *