एक फार महत्वाची बातमी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आहे. जून महिन्याचा १२ वा हफ्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही ? हे कसे तपासायचे ? याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. जून महिन्याचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झालेली असतानाही काही महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही , अशी महिलांनची तक्रार समोर आली आहे . सरकार कडून आता अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरु आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या टप्यात या योजनेचा सर्वच महिलांना लाभ मिळाला. काही अपात्र महिलांनी चुकीचे कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ उचलला आहे. आता सरकार अशाच अपात्र महिलांना या योजनेतून वगळत आहे.
आताच काही दिवसापूर्वी सरकारी कर्मचारी असतानाही या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा लाभ मिळाला नसेल ता त्यांनी सगळ्यात पहिले आपले नाव या योजनेत आहे की नाही ? याची खात्री करायला हवी. लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाव आहे कि आहे हे महिलांना कस चेक करता येणार याची माहिती जाणून घ्या.
लाडकी बहीण योजनेत नाव आहे की नाही हे असे शोधायचे ?
लाडकी बहिण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला अंतिम यादी विभागात जाऊन आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड टाकून मग तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अधिकृत वेबसाईटवर ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला जून महिन्याचाही हप्ता मिळणार आहे आणि यापुढील हप्ते देखील मिळत राहणार आहेत.
महिलांना जून महिन्याचा हफ्ता मिळालेला आहे आता जुलै महिन्याचा हफ्ता कधी मिळेल ?
जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जुलै च्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे यामुळे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्यातच जमा होईल असे म्हटले जात आहे. या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या योजनेचा जुलै महिन्याचा लाभ प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना मिळू शकतो. तथापि या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेले नाही. यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात मिळणार की पुढील महिन्यात मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE