Applications are invited for the recruitment of 143 posts in Home Guard and Civil Defense Organizations. These volunteers will be paid Rs 878 per day. Interested candidates in the age group of 20 to 50 years of the state have been requested to apply by April 2. Candidates will be enrolled on various merit based criteria out of total 100 marks.
Minimum educational qualification of the candidate for this volunteer post is 8th standard pass. Minimum height should be 5.5 feet for male candidates and 4.11 feet for female candidates. In the physical ability test, male candidates are required to complete 1 km run in 5 minutes 30 seconds, while female candidates are required to complete 800 meters run in 5 minutes 30 seconds.
गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटनांमध्ये १४३ पद भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या स्वयंसेवकांना प्रतिदिन ८७८ रुपये मानधन मिळेल. राज्यातील २० ते ५० वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी २ एप्रिलपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूण १०० गुणांपैकी गुणवत्तेनुसार विविध निकषावर उमेदवारांची नावनोंदणी केली जाईल.
या स्वयंसेवक पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता ८वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची ५.५ फूट आणि महिला उमेदवारासाठी ४.११ फूट असणे गरजेचे आहे. शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पुरुष उमेदवाराने १ किमी धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे, तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धावणे ५ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करणे आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी आल्तिनो येथील गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण संघटना, गोवा राखीव पोलिस कॅम्प कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. अर्ज कार्यालयीन दिवशी सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आणि दुपारी २:०० ते सायंकाळी ५:३० या वेळेत उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेले अर्ज कार्यालयात २ एप्रिल किंवा त्याआधी सादर करावेत. उशिरा मिळालेले अर्ज नाकारण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.