JOIN Telegram
Wednesday , 13 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Home Guard भरती च्या Physical चाचणीत काय होणार ; जाणून घ्या !

Home Guard भरती च्या Physical चाचणीत काय होणार ; जाणून घ्या !

Home Guard physical details 2024 :

राज्यात होमगार्डची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुकांना १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येतील. ही नोंदणी विनाशुल्क असणार आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते. होमगार्ड हे सहाय्यकारी दल असून पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणेकरिता सहाय्य करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे.

होमगार्ड म्हणून काम करण्यासाठी कोणते निकष पूर्ण करावे लागतात याविषयी आपण जाणून घेऊया.

  • या भरतीत सहभागी होण्यासाठी उंचीची पात्रता पाहिली तर ती पुरुषांसाठी १६० सें.मी. आहे.
  • तर महिला उमेदवारांसाठी १५० सें.मी उंची असणे बंधनकारक आहे.
  • पुरुषांसाठी छाती ८० सें.मी.- ८४ सें.मी. फुगवून.
  • छातीची अट महिलांना लागू नाही.
  • दृष्टी – दुर दृष्टी ६/६, निकट दृष्टी ०.६/०.६
  • पायाचे गुडघे एकमेकांना स्पर्श व्हायला नको तसेच पायाचे तळवे सपाट नसावे तसेच ६ मिनिटात १ कि.मी. धावणे आवश्यक

होमगार्ड संघटनेचे मुख्य कार्य कोणते?

पोलीस दलाला अंतर्गत सुरक्षा राखणे कामी सहाय्यकारी दल म्हणुन काम करणे हे होमगार्ड संघटनेचे प्रमुख कर्तव्य आहे. परंतु, शांतता व सुव्यवस्था कामी सहाय्यकारी दल म्हणून काम करण्याव्यतिरिक्त इतरही बरीचशी कर्तव्य या दलाला पार पाडावी लागतात व त्याबाबतची तरतूद मुंबई होमगार्ड नियमामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानुसार अग्निशमन, विमोचन, पूरपरिस्थिती, भूकंप, वादळे वगैरे परिस्थितीमुळे निर्माण होणारी आपत्कालीन परिस्थिती अशा निरनिराळया प्रकारच्या परिस्थितीच्या वेळी होमगार्ड संघटना कार्यरत केली जाते. आपत्कालीन अथवा संपकालीन परिस्थितीमध्ये समाजस्वास्थ्यासाठी जीवनावश्यक सेवा चालू ठेवणे व तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अबाधित ठेवणे याबाबत होमगार्ड संघटनेला जबाबदारी उचलावी लागते

शैक्षणिक पात्रता-
होमगार्डसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी इयत्ता १० वी उत्तीर्ण असून वय २० ते ५० वर्षांच्या आत असावे. नोंदणीसाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर  ऑनलाईन अर्ज १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *