महत्वाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या वेतन आयोगापासून ते सध्याच्या सातव्या वेतन आयोगापर्यंत किती टक्के पगार वाढ मिळाली ? याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ.
मोदी सरकारने नव्या आठव्या वेतन आयोगाची स्थापना १६ जानेवारी २०२५ रोजी केली. या आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. आठव्या वेतन आयोगाबाबत गेल्या अनेक महिन्यापासून चर्चा सुरु होती मात्र या नव्या वर्षाची सुरुवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन पहाट ठरली. सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण केली.
सरकारकडे समितीच्या शिफारशी पोहोचल्यात की मग सरकारकडून या शिफारशी स्वीकारल्या जातील आणि प्रत्यक्ष नवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना लागू होणार आहे. खरे तर चौथ्या वेतन आयोगापासून प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे. यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे.
अशा परिस्थितीत आता आपण पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोग पर्यंत कोणत्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना किती टक्के पगार वाढ मिळाली याचा आढावा घेऊयात. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला ?
पहिला वेतन आयोग : 1948 मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाला आणि तत्कालीन काँग्रेस सरकारने या वेतन आयोगातून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40% ने वाढवला.
दुसरा वेतन आयोग : 1959 मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने दुसरा वेतन आयोग लागू केला. दुसऱ्या वेतन आयोगात काँग्रेस सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 50 टक्क्यांनी वाढवण्यात आला.
तिसरा वेतन आयोग : 1973 मध्ये तिसरा वेतन आयोग लागू झाला. तत्कालीन काँग्रेस सरकारने तिसऱ्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.
चौथा वेतन आयोग : 1986 मध्ये चौथा वेतन आयोग लागू झाला. चौथ्या वेतन आयोगातून तत्कालीन काँग्रेस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.
पाचवा वेतन आयोग : 1996 मध्ये पाचवा वेतन आयोग लागू झाला. पाचव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 35 टक्क्यांनी वाढला. सहावा वेतन आयोग : 2006 मध्ये
सहावा वेतन आयोग लागू झाला. सहाव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40 टक्क्यांनी वाढला.
सातवा वेतन आयोग : 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला. एक जानेवारी 2016 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोग लागू आहे. दरम्यान सातव्या वेतन आयोगात देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 14 टक्क्यांनी वाढला. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगात सगळ्यात कमी वेतन वाढ मिळाली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE