JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी!

HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी!

HPCL Recruitment 2024 : HPCL म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये असलेल्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती पीओएल ॲग्रीगेटर या पदासाठी आहे. या पदावर रुजू झाल्यानंतर काय काम असेल तसेच त्याची पात्रता, मूल्यमापनाचे निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घ्या…

प्रत्येक कंपनी ही प्रत्येक आर्थिक वर्षासाठी वेगवेगळे कार्यक्रम ठरवत असते. यामधून कंपनीची वाढ व्हावी आणि प्रगती व्हावी हाच उद्देश समोर ठेवलेला असतो. यासाठी अनेक विविध कौशल्यांची गरज भासणार असते. ही कौशल्य कंपनी त्यांच्याकडे जॉईन होणाऱ्या नव्या उमेदवारांमध्ये शोधत असते. त्यामुळे कंपनीला अपेक्षित असलेली कोणती कौशल्य तुम्हाला अवगत आहेत याबद्दल ती कंपनी जाणून घेत असते.

HPCL म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा वर्ष २०२३-२४ मधील उद्योग हा ४ लाख ५९ हजार ८१५ कोटी इतक्या रुपयांचा झाला. यंदाच्या आर्थिक वर्षात कंपनीचा त्याहून अधिक फायदा व्हावा यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जात आहेत. यातीलच एक म्हणजे नव्या कर्मचाऱ्यांची भरती. एचपीसीएलमध्ये असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी तिथे भरती सुरू असून या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊ.

एचपीसीएलच्या मुंबई कार्यालयात भरती सुरू आहे. या भरतीत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी ठरवून दिलेल्या शेवटच्या दिवसाच्या आधीच त्यांचे अर्ज जमा करावेत. पीओएल ॲग्रीगेटर या पदासाठी ही भरती जाहीर केली गेली आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे.

या पदावर रुजू झाल्यानंतर ऑपरेशनचे क्षेत्र काय असेल, पदावर रुजू होण्यासाठी पात्रतेचे निवडीचे आणि मूल्यमापनाचे निकष काय निकष काय असतील याबद्दलची माहिती एचपीसीएलच्या www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळावर तुम्हाला मिळवता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *