वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

इंटेलिजेंस ब्युरो (IB) येथे नोकरीची सुवर्णसंधी; लाख रुपये मिळणार पगार ! लवकरात लवकर करा अर्ज

इंटेलिजेंस ब्युरो (IB) येथे विविध पदांसाठी मोठी भरती सुरु आहे. या भरती साठी लेखी परीक्षा होणार नाही आहे. थेट मुलखत घेऊन निवड केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०२५ आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

IB Bharti 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि लेखी परीक्षा न देताच थेट गुप्तचर विभागात जायची इच्छा असेल तरी ही नामी संधी सोडू नका. इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड II/टेक (IB ACIO Tech) साठी एक मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. यासाठी निवड फक्त तुमचा GATE स्कोअर, स्किल टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या, म्हणजे 16 नोव्हेंबर 2025 आहे

इंटेलिजेंस ब्युरो ही देशातील सर्वात महत्त्वाची गुप्तचर संस्था आहे. ही भरती मोहीम ACIO ग्रेड-II/टेक पदांसाठी होत असून त्यामध्ये एकूण 258 रिक्त जागा आहेत. ही सर्व पदे ग्रुप-C अंतर्गत येतात. यासाठी अर्ज प्रक्रिया 25 ऑक्टोबरपासून सुरू झाली होती आणि उद्या म्हणजे 16 टनोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. mha.gov.in या वेबसाइटवर ही भरती थेट केली जात आहे.

मात्र या नोकरीसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे तांत्रिक क्षेत्राशी संबंधित पदवी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी, आयटी किंवा संबंधित शाखांमध्ये B.E किंवा B.Techकेले असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. तसेच इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्ससह भौतिकशास्त्र किंवा संगणक अनुप्रयोगांसह विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार देखील या नोकरीसाठी पात्र ठरू शकतात. उमेदवारांनी GATE 2023, 2024 किंवा 2025 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी असे निकष आहेत.

वयोमर्यादा किती ? :  18 ते 27 वयोगटातील व्यक्ती या पदांसाठी अर्ज करू शकतात. तर राखीव प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सूट मिळेल.

पगार किती ? : या पदासाठी चांगली , आकर्षक सॅलरीदेखील आहे. लेव्हल -7 पे स्केलनुसार, तुम्हाला दर महिन्याला 44,900 ते 1,42,400 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तसेच अन्य सरकारी भत्तेही मिळतील.

कसा कराल अर्ज ? :

  • सर्वप्रथम उमेदवारांनी गृह मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट mha.gov.in ही सुरू करावी.
  • त्यानंतर, IB ACIO Tech भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • त्यानंतर, उमेदवारांनी Apply Online वर क्लिक करावे.
  • त्यानंतर, IB ACIO Tech भरती सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • त्यानंतर, उमेदवाराने Apply Online वर क्लिक करावे.
  • मग अर्जाचे शुल्क भरा. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी, कृपया संपूर्ण प्रीव्ह्यू पहा.
  • अंतिम सबमिशननंतर, प्रिंटआउट जपून ठेवा.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

एसेन्स इंटरनॅशनल स्कूल, नागपूर – १७ शैक्षणिक/शिक्षकेतर पदभरती जाहीर

EIS Nagpur Recruitment 2026 - Essence International School invites Online applications till last date 24/1/2026 to fill up.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *