IBPS Clerk Prelims Exam ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आली होती. आता त्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्याना IBPS Clerk Mains Exam देता येईल. IBPS clerk Prelims परीक्षेचा निकाल कसा बघायचा ते जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बँकिंग एक्सामची करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आयबीपीएस च्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) लवकरच आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्सचे निकाल जाहीर करणार आहे.
हे निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाहीर केले जाणार आहेत. अद्याप त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर निकालाची लिंक सक्रिय झालेली नाही पण लवकरच ही लिंक सक्रिय होणार आहे.
निकाल लिंक सक्रिय झाल्यानंतर उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून लॉग इन करून त्यांचे गुण तपासू शकतात.
आयबीपीएस क्लार्क प्रिलिम्सचा निकाल कसा बघायचा?
- आयबीपीएस क्लार्क प्रिलिम्सचा निकाल ibps.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल. यासाठी सर्वप्रथम वेबसाईटला भेट द्या आणि होमपेजवरील IBPS क्लर्क प्रिलिम्स निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
- मग तुमचा अर्ज क्रमांक किंवा रोल नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख किंवा पासवर्ड एंटर करावा लागेल. मग सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. या सर्व डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे.
- लॅपटॉप किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल आणि भविष्यातील वापरासाठी तुम्ही तुमचे हे ऑनलाईन गुणपत्रक सेव करू शकता किंवा त्याची प्रिंट आउट काढून पुढील वापरासाठी सांभाळून ठेवू शकता.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati