नागपुरमध्ये ‘आयबीपीएस’च्या परीक्षेत गोंधळ, सुमारे ४० विद्यार्थांना प्रवेश नाकारला !
IBPS Nurses Recruitment Exam 2024 : शैक्षणिक कागदपत्रांवर वडिलांचे नाव आहे, मात्र आधारकार्डवर पतीचे नाव आहे, असे कारण सांगूनही परीक्षा केंद्रातील प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. नियमांची माहिती नसणाऱ्या सुरक्षा रक्षकावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. वर्षभर अभ्यास करूनही परीक्षेला बसू न दिल्याने या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली.
आयबीपीएस मेडिकल ग्रुप डीच्या परीक्षेत सुमारे ४० विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आम्ही वंचित राहिलो असल्याची भावना व्यक्त करीत या विद्यार्थ्यांनी थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. आम्हाला पुन्हा परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या पदांसाठी सोमवारी दुपारी १२.३० वाजता एमआयडीसी-वाडी येथील केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षेसाठी दाखल झाले. साडेअकरा वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहोचावे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. विद्यार्थी १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान वेळेच्या आधीच पोहोचले. परीक्षा केंद्रात जाण्यासाठी विद्यार्थी रांगेत लागले. प्रवेशद्वारावर उभा असलेला सुरक्षा रक्षक कागदपत्रे तपासून विद्यार्थ्यांना आत सोडत होता. आधार कार्ड असतानाही विवाह प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. परिचारिकेच्या परीक्षेसाठी पारडी येथून आलेल्या भावना मून यांनी मोबाइलमध्ये असलेली सॉफ्ट कॉपी दाखविली. मात्र विवाह प्रमाणपत्राची मूळ प्रत आणा असे सांगून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला.
शैक्षणिक कागदपत्रांवर वडिलांचे नाव आहे, मात्र आधारकार्डवर पतीचे नाव आहे, असे कारण सांगूनही परीक्षा केंद्रातील प्रवेश नाकारण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. नियमांची माहिती नसणाऱ्या सुरक्षा रक्षकावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. वर्षभर अभ्यास करूनही परीक्षेला बसू न दिल्याने या विद्यार्थ्यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली. २८ ऑगस्ट आणि ४ सप्टेंबरलाही परीक्षा आहेत, त्यामुळे आम्हाला पुन्हा संधी मिळावी, अशी मागणी मून यांनी केली. काहींनी ऐन वेळी धावपळ करून विवाह प्रमाणपत्राची रंगीत झेरॉक्स आणली, पण त्यांनाही प्रवेश दिला नाही, अशा तक्रारी या विद्यार्थ्यांनी केल्या.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

