वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

ICSI CS परीक्षेचा निकाल जाहीर !

ICSI CS Executive and Professional June 2025 चा निकाल आज दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी दोन्ही परीक्षेचा निकाल जाहीर झाला.  एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षेचा निकाल icsi.edu या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या वेबसाईट वरून  उमेदवार आवश्यक ते तपशील  करून आपला निकाल तपासू शकता.

ICSI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रोफेशनल प्रोग्राम (अभ्यासक्रम २०१७ आणि अभ्यासक्रम २०२२) चा निकाल आज सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला आहे, तर एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम (अभ्यासक्रम २०२२) चा निकाल दुपारी २ वाजता जाहीर करण्यात आला आहे.

ICSI CS Result declared 2025

‘आयसीएसआय सीएस’चा जून २०२५ चा निकाल जाहीर झाला असून तो चपासण्यासाठी तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट icsi.edu ला भेट द्यावी लागेल. तिथे वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला निकालाच्या सक्रिय लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला विचारलेले तपशील (लॉगिन क्रेडेन्शियल्स) प्रविष्ट करावे लागतील आणि ते सबमिट करावे लागतील. त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर उघडेल जिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढून घेऊ शकता.

विद्यार्थी आज फक्त गुणपत्रिकेची प्रत डाउनलोड करू शकतात, निकालाची प्रत्यक्ष प्रत दिली जाणार नाही. मूळ गुणपत्रक ICSI द्वारे उमेदवारांच्या नोंदणीकृत पत्त्यावर 30 दिवसांच्या आत पोहोचवले जाईल. जर उमेदवारांना निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत गुणपत्रक मिळाले नाही, तर त्यांना exom@icsi.edu वर त्यांचा नोंदणी क्रमांक नमूद करून अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागेल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

WCEM नागपूर – शैक्षणिक पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

WCEM Nagpur Teaching Recruitment 2025 - President, Wainganga Bahu-Uddeshiya Sanstha, Nagpur's Wainganga College....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *