इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (Institute of Company Secretaries of India) ICSI ने मे २०२५ सत्रासाठी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह एन्ट्रन्स टेस्ट (Company Secretary Executive Entrance Test) CSEET चा निकाल जाहीर केला आहे.
परीक्षेत बसलेले उमेदवार ICSI च्या अधिकृत वेबसाइट icsi.edu ला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. ही परीक्षा ३ मे आणि ५ मे रोजी घेण्यात आली. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे गुणपत्रक देखील अपलोड करण्यात आले आहे.
आयसीएसआय कोणत्याही उमेदवाराला निकालाच्या प्रत्यक्ष प्रती देणार नाही, अशी माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे. संस्थेने जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, परीक्षेचे औपचारिक ई-रिझल्ट-कम-मार्क्स स्टेटमेंट निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच संस्थेच्या वेबसाइट icsi.edu वर अपलोड केले जाईल, जे उमेदवार डाउनलोड करू शकतात. अधिक माहितीसाठी, उमेदवार आयसीएसआय वेबसाइटला भेट देऊ शकतात.
निकाल कसा डाउनलोड करायचा?
ICSI ची अधिकृत वेबसाइट icsi.edu ला भेट द्या.
होम पेजवर दिलेल्या CSEET मे २०२५ निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
आता आयडी आणि जन्मतारीख टाका आणि सबमिट करा.
तुमच्या स्क्रीनवर स्कोअरकार्ड दिसेल.
ते तपासा आणि प्रिंटआउट घ्या.
उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी साठी निकाल जाहीर झाल्यापासून ६० दिवसांच्या आत अर्ज करावा लागेल. परीक्षेत एकूण किमान ५०% गुण आणि प्रत्येक विषयात ४०% गुण मिळवलेले उमेदवार उत्तीर्ण असतील. परीक्षेत बिझनेस कम्युनिकेशनमधून ५० गुण, लीगल अॅप्टिट्यूड अँड लॉजिकल रिझनिंगमधून ५० गुण, इकॉनॉमिक अँड बिझनेस एन्व्हायर्नमेंटमधून ५० गुण, करंट अफेयर्स आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूडमधून ५० गुणांचे प्रश्न विचारण्यात आले होते.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE