वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IDBI बँकेत SCO पदांची भरती जाहीर ; दरमहा २ लाख पर्यंत पगार ! लवकर अर्ज करा

IDBI Bank has announced recruitment for Specialist Cadre Officer (SCO) posts : आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ही एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

बँकेने अधिकृत वेबसाईट www.idbibank.in वर अर्जासाठी लिंक सक्रिय केली आहे. उमेदवार २० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

IDBI Bank Recruitment for SCO Posts 2025

या भरती अंतर्गत आयडीबीआयने विविध विभागांमध्ये डिप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर अशा पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांसाठी आवश्यक पात्रता पदानुसार वेगळी आहे. बी.ई., बी.टेक., एमसीए, एमएससी, एमबीए, सीए, बीएससी किंवा संगणक शास्त्र, आयटी, इलेक्ट्रॉनिक्ससारख्या संबंधित क्षेत्रातील पदवी/पदव्युत्तर पदवी असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचबरोबर, संबंधित पदानुसार अनुभव असणेही गरजेचे आहे. अधिक तपशीलासाठी अधिकृत भरती अधिसूचनेचा अभ्यास करावा.

वयोमर्यादा:
किमान वय: २५ वर्षे

कमाल वय: ४५ वर्षे (पदाच्या स्वरूपानुसार)

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

वेतनश्रेणी उपमहाव्यवस्थापक (ग्रेड D): ७ वर्षांचा अनुभव – ₹१,९७,००० प्रतिमाह

सहाय्यक महाव्यवस्थापक (ग्रेड C): ८ वर्षांचा अनुभव – ₹१,६४,००० प्रतिमाह

व्यवस्थापक (ग्रेड B): १२ वर्षांचा अनुभव – ₹१,२४,००० प्रतिमाह
(हे मूळ वेतन असून, यामध्ये इतर भत्तेही समाविष्ट होतील)

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड ही शैक्षणिक पात्रता, अनुभव, स्क्रीनिंग प्रक्रिया आणि इतर निकषांवर आधारित केली जाईल.

स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर म्हणून बँकिंग क्षेत्रात उच्च पदावर कार्य करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. वेळेवर अर्ज करून ही संधी साधा.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

NABARD अंतर्गत भरघोस वेतनावर ‘या’ ५ पदांसाठी त्वरित अर्ज करा !

NABARD Specialist Recruitment 2025 - National Bank For Agricultural & Rural Development invites Online applications in....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *