JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

IIM साठी अर्जप्रक्रियेला सुरुवात;‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज !

IIM साठी अर्जप्रक्रियेला सुरुवात;‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज !

IIM Admission 2024 :

IIM कोलकत्ताने CAT २०२४ साठी अर्जप्रक्रियेला सुरुवात केली आहे. १ ऑगस्ट पासून अर्जप्रक्रियेला सुरवात झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. अर्जप्रक्रियेची अंतिम तारीख १३ सप्टेंबर असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी लवकर अर्ज करण्याचे निर्देश IIM ने दिले आहेत.
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट कोलकत्ताने कॉमन एडमिशन टेस्टसाठी तारखा शेड्युल केल्या आहेत. IIM साठी प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना CAT २०२४ साठी अर्ज करता येणार आहे. यासंबंधित संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर प्राप्त होईल. १ ऑगस्ट २०२४ पासून अर्जप्रक्रियेला सुरवात झाली असून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. अर्जप्रक्रियेची अंतिम तारीख १३ सप्टेंबर असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी लवकर अर्ज करण्याचे निर्देश IIM ने दिले आहेत.

जारी केले गेलेल्या अटी शर्तींमध्ये पात्र विद्यार्थ्यांनाच परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. अर्जकर्त्या विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. जर विद्यार्थी एसटी, एससी, पीडब्ल्यूडी कॅटेगरीत असेल तर विद्यार्थी किमान ४५% गुणांनी पदवीधर असावा तर इतर विद्यार्थ्यांसाठी गुणांचा टक्का ५०% आहे. विशेष म्हणजे अंतिम वर्षात शिकारीत असलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्यास मुभा दिली गेली आहे.

एसटी, एससी, पीडब्ल्यूडी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी अर्जशुल्क १२५० रुपये असून, इतर विद्यार्थ्यांना अर्ज शुल्कासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत. IIM कोलकाताच्या अनुसार, विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत आपल्या आवडीच्या शहरांपैकी पाच शहरे निवडण्याची मुभा दिली जाईल, तसेच कॉमन एडमिशन टेस्ट २०२४ १७० शहरांमध्ये आयोजित केली जाईल.

विद्यार्थ्यांना १ ऑगस्टच्या सकाळी १० वाजल्यापासून ते १३ सप्टेंबरच्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. नोव्हेंबरच्या ५ तारखेला परीक्षेचे ऍडमिट कार्ड जारी केले जातील. तर कॉमन एडमिशन टेस्ट २०२४, नोव्हेंबरच्या २४ तारखेला आयोजित केली जाईल. परीक्षेचा निकाल जानेवारी २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे करता येईल CAT २०२४ साठी अर्ज

  • अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in वर जा.
  • CAT Registration २०२४ वर क्लिक करा.
  • मागितलेली महत्वाची माहिती भरून घ्या.
  • अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  • अर्जाची प्रत स्वतःकडे ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *