वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IIM मुंबई मध्ये विविध पदांची भरती ; २०८७०० रुपयांपर्यंत मिळणार पगार ! लवकरात लवकर करा अर्ज

IIM Mumbai अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भारतीप्रक्रियेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईट वर जाऊन करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ ही आहे. या भरतीत  प्रोग्राम ऑफिसर, लायब्ररी ऑफिसर, असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराने अर्ज वेळेत आणि काळजीपूर्वक करावा.

शैक्षणिक पात्रता –

प्रोग्राम ऑफिसर पदासाठी: मान्यताप्राप्त संस्थेतून पदव्युत्तर पदवी आणि किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक.

लायब्ररी ऑफिसर पदासाठी: लायब्ररी सायन्स किंवा इन्फॉर्मेशन सायन्समध्ये मास्टर्स डिग्री आणि किमान १५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

असिस्टंट मॅनेजर पदांसाठी: कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी आणि संबंधित क्षेत्रात ठराविक अनुभव असणे बंधनकारक

IIM Mumbai Bharti 2025

वेतनमान 

प्रोग्राम ऑफिसर पदासाठी वेतन स्तर ११ नुसार ६७,७०० – २,०८,७०० रुपये वेतन असेल. इतर तिन्ही पदांसाठी वेतन स्तर १० नुसार ५६,१०० – १,७७,५०० रुपये वेतन मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया व शुल्क –

उमेदवारांना आयआयएम मुंबईच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी ५९० रुपये शुल्क भरावे लागेल, जे परत मिळणार नाही. मात्र एससी, एसटी, PwD आणि संस्थेतील कायम कर्मचाऱ्यांसाठी हे शुल्क माफ आहे. अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया

संस्थेकडे लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी किंवा मुलाखती घेण्याचा अधिकार आहे. मात्र किमान पात्रता निकष पूर्ण केल्यामुळे मुलाखतीसाठी बोलावले जाईल याची हमी दिलेली नाही. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी, प्रतिनियुक्ती किंवा कराराच्या स्वरूपात नियुक्ती दिली जाऊ शकते.

IIM mumbai भरती २०२५ पीडीएफ फाईल –

https://iimmumbai.ac.in/storage/uploads/careers/2326/175394454556.pdf

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

भीमा सह. साखर कारखाना लि., जि. सोलापूर – अल्पशिक्षित/ITI/इतर ; २११ विविध कर्मचारीवृंद पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BSSKL Recruitment 2025 - Bhima Sahakari Sakhar Karkhana Limited, Dist. Solapur has arranged interview on date 4/11/2025 for.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *