IIT Delhi open Admission portal for Joint Entrance Examination for Masters programmes : IIT दिल्लीने मास्टर्स प्रोग्राम्ससाठी प्रवेश पोर्टल सुरू केले . इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT दिल्ली) ने आज, २६ मार्च २०२५ पासून विविध मास्टर्स प्रोग्राम्ससाठी संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी (JAM 2025) प्रवेश पोर्टल ओपन केले आहे. पात्र उमेदवार, त्यांच्या संबंधित श्रेणी आणि JAM 2025 प्रवेश परीक्षेतील कामगिरीवर आधारित https://jam2025.iitd.ac.in/ या JOAPS पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात. या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ एप्रिल २०२५ असणार आहे.
सर्व पात्र उमेदवारांना JOAPS पोर्टलद्वारे त्यांच्या सध्याच्या प्रमाणपत्रांसह स्कोअरकार्ड मिळाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेतील निवड चार फेऱ्यांमध्ये केली जाईल, ज्यामध्ये उमेदवारांना त्यांच्या पात्रता चाचणी पेपर्सच्या आधारे प्रोग्रॅम आणि संस्था निवडण्याची संधी मिळेल.
IIT दिल्लीने २ फेब्रुवारी २०२५ रोजी मास्टर्स (JAM) २०२५ साठी संयुक्त प्रवेश परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेसाठी ६६,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी सुमारे ८३% विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. एकूण १६,००० हून अधिक उमेदवार सर्व श्रेणींमध्ये पात्र ठरले आहेत.
ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) स्वरूपात घेतली गेली असून यात सात चाचणी पेपर्स समाविष्ट आहेत. परीक्षेतील प्रश्न तीन प्रकारांचे होते: बहुपर्यायी प्रश्न (MCQ), एकाधिक निवड प्रश्न (MSQ), आणि संख्यात्मक उत्तर प्रकार (NAT) प्रश्न. या परीक्षेत १०५ वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये ५,३०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, जैवतंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि गणितीय सांख्यिकी या सात विज्ञान विषयांमध्ये घेतली गेली.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE