जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात सध्या शिक्षकांच्या ८५ पदांचा अभाव आहे. ही रिक्त पदे सध्या पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांकडून तात्पुरत्या स्वरूपात सांभाळली जात आहेत. मात्र, या रिक्त पदांमुळे १२ वर्षांनंतर नियुक्त झालेले पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी यांना प्रशासन व शिक्षणाशी संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील १६,३१८ विद्यार्थ्यांकरिता ९६५ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, अनेक पदे रिक्त असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमावर प्रतिकूल परिणाम होत असून, ही पदे तत्काळ भरण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. तालुक्यात केंद्रप्रमुखांची २५ पदे रिक्त आहेत.

त्यामुळे पदवीधर शिक्षक किंवा उपशिक्षक यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. यामुळे अध्यापनाचे काम खोळंबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची ६ पदे रिक्त असल्यामुळे उर्वरित ४ अधिकाऱ्यांवर दहा बीटचे काम येत आहे. त्यामुळे कामाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
शासनाने केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या ५०% पदांना पदोन्नतीने भरावं, आणि उर्वरित ५०% पदांसाठी सरळसेवा परीक्षेची अधिसूचना जारी करून ती तात्काळ घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून ग्रामविकास मंत्र्यांकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे, अशी माहिती मोहन नाडेकर यांनी दिली.
सध्या शासन शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत गुंतलेलं आहे. परंतु प्रत्येक तालुक्यात मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. शिक्षक संघटनांनी वारंवार मागणी करूनही ही पदे भरली गेली नाहीत. परिणामी अनेक अधिकाऱ्यांवर तीन-चार केंद्रांचा अतिरिक्त पदभार आहे. बदल्यांपूर्वी ही पदे भरली असती, तर अनेक शिक्षकांना पदोन्नतीची संधी मिळाली असती, आणि त्याच प्रमाणात बदल्यांकरिता पात्र जागा उपलब्ध झाल्या असत्या.
त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची वेळ आली नसती. – तानाजी तळपे, माजी सरचिटणीस, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण विभागातील पदांची स्थिती (मंजूर – कार्यरत – रिक्त) : गटशिक्षणाधिकारी – १ – १ – ० शिक्षण विस्तार अधिकारी – १० – ४ – ६ केंद्रप्रमुख – ३२ – ७ – २५ मुख्याध्यापक – २९ – १४ – १५ पदवीधर शिक्षक – १२३ – ११९ – ४ उपशिक्षक – ८५० – ८१५ – ३५ वरिष्ठ सहाय्यक – २ – २ – ० कनिष्ठ सहाय्यक – २ – २ – ० परिचर – १ – १ – ०
एकूण – १०५० मंजूर पदांपैकी ९६५ कार्यरत असून ८५ पदे रिक्त आहेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati